Akshay Shinde च्या अंत्यविधीला अद्याप जागा नाहीच; अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतही विरोधाचे बॅनर

142
Akshay Shinde च्या अंत्यविधीला अद्याप जागा नाहीच; अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतही विरोधाचे बॅनर
Akshay Shinde च्या अंत्यविधीला अद्याप जागा नाहीच; अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतही विरोधाचे बॅनर

अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर, अंबरनाथ आणि ठाण्यातील स्मशानभूमींमध्ये चाचपणी सुरू केली आहे. मात्र, अनेक शहरांमधून त्यांच्या अंत्यविधीला विरोध सुरुच आहे. आता अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध करण्यात येतोय. स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेधाचा बॅनर लावण्यात आला आहे.

(हेही वाचा-Mumbra Firing : मुंब्र्यातील गोळीबारात 19 वर्षांचा तरुण जखमी; आरोपी ताब्यात)

बदलापूर घटनेतील विकृत नराधम अक्षय शिंदेला (Akshay Shinde) अंबरनाथ हिंदूस्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात जाहीर निषेध असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलाय. अक्षय शिंदेचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने गुरूवारी उच्च न्यायालयात हमी दिली होती. शिवाय, अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) अंत्यविधी शांततेत होईल याची पोलीस खबरदारी घेतील अशी हमी ही राज्य सरकारकडून हायकोर्टात देण्यत आली होती. मात्र, अजूनही हा अंत्यविधी झालेला नाही.

(हेही वाचा-World Heart Day 2024 : मुंबईत ११ टक्के मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने)

अक्षय शिंदेचे (Akshay Shinde) वकिल अमित कटारनवरे म्हणाले, सरकार दफनभूमीसाठी जागा देत नाही. आपल्या देशात सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली तर याकूब मेमन सारख्या व्यक्तीला या देशात जागा मिळते. हेच सरकार असतं त्याच्या अंत्ययात्रेत अनेक जण येतात. मात्र अक्षयला कुठल्याही न्यायालयाने अद्याप दोषी ठरवला नाही तरी देखील त्याला दफनभूमीसाठी जागा मिळत नाही हे पटण्यासारखं आहे का ? असा सवालही कटारनवरे यांनी केला.

पुढे बोलताना कटारनवरे म्हणाले, सरकारला जागा मिळत नाही, तुम्हाला तरी वाटतंय का? ही गोष्ट पटण्यासारखी आहे का? मी स्वतः पाहिलं नाही आणि जोपर्यंत मी डॉक्यूमेंट पाहत नाही खरोखरच जर त्याची बाजू न्यायालयासमोर मांडली असती सत्य काय ते बाहेर आला असतं. तर त्याला रंगा बिल्ला सारखी डबल फाशी दिली असती तरी काय हरकत नव्हती. असं वकील म्हणाले आहेत. (Akshay Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.