Amit Shah : ‘मिशन मुंबई’साठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर, विधानसभेसाठी रणनिती काय?

113
Amit Shah दोन दिवस मुंबईत?
Amit Shah दोन दिवस मुंबईत?

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) १ आणि २ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विशेष रणनिती आखणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मुंबईत अपेक्षित यश न मिळाल्याने, विधानसभा निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी भाजपने “मिशन मुंबई” (Mission Mumbai) अंतर्गत जोरदार तयारी सुरू केली आहे.

मुंबईतील धोकादायक मतदारसंघांवर विशेष लक्ष

अमित शाह (Amit Shah) यांचा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीसाठी बुथ स्तरावर मायक्रो प्लॅनिंग करण्याचे नियोजन करणार आहेत. मुंबईतील धोकादायक मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे, जेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रभाव आहे. शाह या मतदारसंघांच्या बूथ व्यवस्थापनाची बारकाईने तपासणी करून, प्रभावी संपर्क अभियानाची आखणी करतील.

मुंबईसाठी ‘ही’ खास रणनिती तयार

विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यानंतर आता मुंबईसाठी ही खास रणनिती तयार केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईतील चार जागांवर पराभव स्विकारावा लागला होता, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यावर भाजपचे लक्ष केंद्रित आहे. अमित शाह (Amit Shah) यांचा हा दौरा, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आगामी निवडणुकांसाठी दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मतदारसंघांवर बुथ नियोजन व संपर्क योजनेसाठी विशेष मोहीम

शाह (Amit Shah) पक्षातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, मुंबईतील मतदारसंघांची विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धोकादायक मतदारसंघांवर बुथ नियोजन व संपर्क योजनेसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या दौऱ्यामुळे भाजपची विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीची गती वाढणार असून, विशेषतः मुंबईतील रणनीती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. (Amit Shah)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.