सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणणारे Udhayanidhi Stalin होणार तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री

63
सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणणारे Udhayanidhi Stalin होणार तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री
सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणणारे Udhayanidhi Stalin होणार तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री

तमिळनाडूतील (Tamil Nadu) द्रमुक सरकारने सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणून अवमान करणारे उदयनिधी स्टॅलिन यांना बढती दिली आहे. राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सरकारच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त नियोजन आणि विकास खात्यांचे वाटप करण्यात आले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारसी स्विकारल्या असून उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा आहेत.

(हेही वाचा – Amit Shah : ‘मिशन मुंबई’साठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर, विधानसभेसाठी रणनिती काय?)

याचबरोबर आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर नुकतेच जामिनावर सुटलेले व्ही. सेंथिल बालाजी यांच्यासह डॉ. गोवी आणि आर. राजेंद्रन, थिरू एसएम नस्सर यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. नवे मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवार, दुपारी 3.30 वाजता राजभवन, चेन्नई येथे होणार आहे.

‘या’ मंत्र्यांना हटवणार

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दूध व दुग्धविकास मंत्री टी. मानो थंगराज, अल्पसंख्याक कल्याण आणि अनिवासी तमिळ कल्याण मंत्री के. एस. मस्थान आणि पर्यटन मंत्री के. रामचंद्रन यांना मंत्रिपरिषदेवरुन हटवण्याचीही शिफारस केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या या शिफारसीला देखील मंजूरी दिली आहे.

सनातन धर्मावर केलेल्या विखारी टिकेमुळे देशभर संताप

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन निर्मूलन परिषदेत बोलतांना सनातन धर्माविषयी केलेल्या अश्लाघ्य टिकेनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. सनातनला केवळ विरोध करून चालणार नाही. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. तो नष्टच करावा लागतो. सनातनलाही नष्ट करायचं आहे, असे विखारी उद्गार स्टॅलिन यांनी काढले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.