Bareilly (उत्तरप्रदेश) येथे बेकायदेशीर मशिदीची भिंत हिंदूंनी पाडली; पोलिसांनी पुन्हा बांधली

170
Bareilly (उत्तरप्रदेश) येथे बेकायदेशीर मशिदीची भिंत हिंदूंनी पाडली; पोलिसांनी पुन्हा बांधली
Bareilly (उत्तरप्रदेश) येथे बेकायदेशीर मशिदीची भिंत हिंदूंनी पाडली; पोलिसांनी पुन्हा बांधली

बरेली (उत्तरप्रदेश) येथील दांडी गावात बेकायदेशीररित्या मशीद बांधण्यात आल्याने हिंदूंनी त्याला विरोध चालू केला आहे. हिंदूंनी या मशिदीची एक भिंत पाडून टाकल्याने येथे मोठा तणाव निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाडण्यात आलेली भिंत पोलिसांनी बांधून दिली आहे. या बेकायदा बांधकामाविषयी हिंदूंनी ३ महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्या वेळी प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत बांधकाम बंद पाडले होते; मात्र त्यानंतरही बेकायदा बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले नसल्याने हिंदूंमध्ये संताप वाढू लागला.

(हेही वाचा – “सीएम म्हणजे कॉमन मॅन, पूर्वीचे तर…”, मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा ठाकरेंना चिमटा)

२७ सप्टेंबर या दिवशी हिंदूंनी बेकायदेशीर मशिदीच्या भिंतीचा एक भाग पाडला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्यांच्या देखरेखीखाली पुन्हा भिंत बांधली. या वेळी हिंसाचारही झाला. या प्रकरणी पोलिसांनी काही हिंदूंना अटकही केली. या अटकेमुळे हिंदू संतप्त झाले आणि त्यांनी भाजपचे आमदार खासदार डॉ. आर्य यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने चालू केली. अटक करण्यात आलेल्या तरुणांची विनाअट सुटका करून बेकायदा बांधकामे पूर्णपणे बंद करण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

पोलिसांनी भिंत पुन्हा बांधून दिल्याने त्यांच्या भूमिकेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत; कारण हिंदूंनी आरोप केला आहे की, पोलीस मुसलमानांच्या बाजूने काम करत असून बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत आहेत. पोलीस अधीक्षक मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, प्रशासनाने यापूर्वीही मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम रोखण्यासाठी पावले उचलली होती. दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार बांधकाम आधीच थांबवण्यात आले होते.’ हिंदूंचा आरोप आहे की, तेथे नमाजपठण केले जात होते आणि बांधकाम गुपचूपपणे पुन्हा चालू करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.