महानुभाव पंथाच्या तीर्थस्थान विकासासाठी आणखी भरघोस निधीची तरतुद करणार: Devendra Fadnavis

43
महानुभाव पंथाच्या तीर्थस्थान विकासासाठी आणखी भरघोस निधीची तरतुद करणार: Devendra Fadnavis
महानुभाव पंथाच्या तीर्थस्थान विकासासाठी आणखी भरघोस निधीची तरतुद करणार: Devendra Fadnavis

महानुभाव पंथाच्या तीर्थस्थान विकासासाठी आमचे सरकार आणखी भरघोस निधीची तरतुद करणार असून महानुभाव संप्रदायाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. देशात असा कोणता जिल्हा किंवा गाव नाही की जेथे महानुभाव पंथाचे घर नाही. महानुभाव पंथाच्या विकास कामांसाठी जी काही मदत करता आली ते माझे भाग्य समजतो. हा कृतज्ञता सोहळा नसून, एक प्रकारे माझ्यासाठी आशीर्वाद सोहळा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

(हेही वाचा-Advocate Academy : नवी मुंबईत होणार देशातील पहिली ॲडवोकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्र)

अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे महाकवी कालिदास कला मंदिर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी महंत कारंजेकर बाबा ( अमरावती ) उपस्थित होते. तर, व्यासपीठावर महंत वर्धनस्थ बाबा बिडकर (रणाईचे ), विद्ववंसबाबा शास्त्री (फलटण ) ,पारीमांडल्य आश्रमाचे महंत लासुरकर बाबा, महंत शेवलीकर बाबा (शहादा ), महंत जामोदेकर बाबा (गाजियाबाद ), महंत आंबेवडगावकर बाबा (पाचोरा ), महंत चिंचोडीकर बाबा (जाळीचादेव ), महंत सुकेणेकर बाबा (सुकेणे ), महंत सातारकर बाबा (फलटण ), माजी आमदार बाळासाहेब सानप, अविनाश ठाकरे, दिनकर पाटील, प्रकाश नन्नवरे, राजेंद्र जायभावे, महंत बाभूळगावकर शास्त्री (छत्रपती संभाजीनगर ), महंत कापूसतळणीकर बाबा (फलटण ) महंत नागराज बाबा उपाख्य तपस्विनी आत्याबाई कपाटे (छत्रपती संभाजीनगर ) महंत लाड बाबा, महंत संतोषमुनी कपाटे , महंत नांदेडकर बाबा, महंत गुजर बाबा, महंत राजधर बाबा, महंत बदनापूरकर बाबा आदींसह संत महंत उपस्थित होते. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा-Nepal flood: नेपाळ पुरामुळे उध्वस्त! आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक बेपत्ता)

फडणवीस म्हणाले की, मी ठरवलं ज्या दिवशी सत्कार्य करू त्या दिवशी सत्कार घेऊ. परंतु या सर्व मंडळीचा आग्रह होता. राज्यातील आमच्या पंथातील प्रमुख लोक आहेत तुमचा हा कृतज्ञता सोहळा होणार आहे आणि मला देखील मोह झाला. अध्यात्मिक आणि सज्जन शक्ती एकत्र येत असेल तर त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली आहे. ३२ वर्षांपासून महानुभव पंथा सोबत सबंध आहे. अनेक ठिकाणी स्थानाना भेटी दिल्या. अतिशय निस्वार्थ भावनेने लोक काम करताना दिसतात. आठशे वर्षांपूर्वी गुलाम बनवण्याचे काम सुरू होते तेव्हा चक्रधर स्वामी यांनी अतुलनीय काम केले. समाज हा मातीच्या भिंतीत होत नाही समाज घडवण्याचे काम अटकेपार विचार नेण्याचे काम महानुभव पंथाने केला. अनेक धार्मिक स्थळांवर अतिक्रमण झाले, स्मशानभूमीवर अतिक्रमण झाले, अनेक ठिकाणी अडचणी आलाय आपण शक्ती कधीच कमी होऊ दिली नाही. अनेक अडचणी असतानाही या पंथाने कधी आंदोलन अथवा मोर्चा काढला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्यभरातील महानुभव संत महंत, अनुयायी उपस्थित होते. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.