CM Yogi Aditynath म्हणतात, जम्मू-काश्मीरमध्ये आता मौलवीही घेत आहेत रामनाम..

44
CM Yogi Aditynath म्हणतात, जम्मू-काश्मीरमध्ये आता मौलवीही घेत आहेत रामनाम..
CM Yogi Aditynath म्हणतात, जम्मू-काश्मीरमध्ये आता मौलवीही घेत आहेत रामनाम..

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Aditynath) दि. २८ सप्टेंबर रोजी हरियाणा निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी फरिदाबाद एनआयटी विधानसभा मतदारसंघातील प्रचारात योगी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर आता मौलवीही राम-राम म्हणतात. तसेच अटेलीला योगी म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राम मंदिर बांधणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता लवकरच अयोध्येत एक मोठे मंदिर दिसेल.

( हेही वाचा : “मला कोल्डप्ले कार्यक्रमाची तिकीटं…” Devendra Fadnavis नेमकं काय म्हणाले?

दरम्यान देशाचे विभाजन आणि दहशतवादासाठी योगींनी कॉग्रेस सरकारला जबाबदार धरले. काँग्रेसच्या (Congress) भूमिकेमुळे अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारण्यासाठी हिंदूंनी ७६ लढाया केल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेशात राम मंदिरांनंतर कृष्ण मंदिर उभारण्याची वेळ आली आहे. ज्यामुळे भाजपने नवे विकासाचे आयाम प्रस्थापित केले आहेत.

राममंदिरासाठी हिंदू आणि शीखांचे बलिदान

फरिदाबाद येथे योगी (CM Yogi Aditynath) म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी लाखो हिंदू आणि शीखांनी बलिदान दिले आहे. काँग्रेसने निर्माण केलेल्या वादामुळे ६५ वर्षात राममंदिर (Ayodhya Ram Mandir) होऊ शकले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात राममंदिर उभारण्यात आले. पण काँग्रेसला अयोध्येत राममंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारता आले असते का? असा सवाल ही योगींनी विचारला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.