गाझीपुरचे सपा खासदार अफजल अन्सारी (MP Afzal Ansari ) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मठ मंदिरातील ऋषी- मुनींसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी राजकुमार शुक्ला (Rajkumar Shukla) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा : महात्मा फुले ब्राह्मणविरोधी नव्हते; Chhagan Bhujbal यांना आली उपरती)
सपा खासदार अफजल अन्सारी (MP Afzal Ansari) यांनी दि. २७ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, भांगेसारखे गांजालाही विक्रीची परवानगी द्याला हवी. तसेच मठ, मंदिरातील ऋषी- मुनींचा दाखला देत ते म्हणाले, साधू-संत मठामध्ये भकाभक गांजा ओढतात. महाकुंभासाठी (Maha Kumbh) गांजाची गाडी पाठवली तरी तीसुद्धा कमी पडेल. त्यामुळे गांजाचा वापर कायदेशीर केला पाहिजे, असे विधान ही अन्सारी यांनी केले. त्यामुळे हिंदू संघटनांनी (Hindu organizations) आणि ऋषी मुनींनी खासदार अन्सारी यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
पोलिस स्टेशनचे प्रभारी राजकुमार शुक्ला (Rajkumar Shukla) यांनी अन्सारी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. त्यात लिहले आहे की, गांजाचा वापर कायदेशीर करावा कारण धार्मिक कार्यक्रमात ऋषी मुनी आंनदाने गांजा ओढतात, असे विधान अन्सारी यांनी केले आहे. त्यामुळे खासदार अन्सारी (MP Afzal Ansari) यांचे हे विधान कलम ३५३ (३) BNS अंतर्गत दंडनीय आहे. या गुन्ह्यासाठी पाच वर्षाच्या शिक्षेची तरतुद आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community