येत्या ३ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव (Navratri Festival) धुमधडाक्यात साजरा केला जाईल. या सणानिमित्त देशभरात चैतन्याचं वातावरण पाहायला मिळेल. पण हा नवरात्रोत्सव ( Navratri Festival) का साजरा केला जातो? आणि नवरात्री म्हणजे नेमकं काय हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
नवरात्री म्हणजे नेमकं काय?
हिंदू धर्मात वर्षाला एकूण चार वेळा नवरात्री येते. त्यापैकी चैय आणि शारदीय नवरात्रीला अन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात की, हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीला ( Navratri Festival) होते. तर शारदीय नवरात्रीला दुर्गादेवी ९ दिवसांसाठी पृथ्वीवर येते. त्यामागे कारण असे की, पृथ्वीला हिंदू धर्मांनुसार दुर्गादेवीचे माहेर म्हटले आहे. देवीच्या आगमनामुळे या ९ दिवसांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विशेषत: हिंदू स्त्रिया ९ दिवस उपवास करतात.
नवरात्री उत्सव का साजरा केला जातो?
नवरात्रोत्सव ( Navratri Festival) साजरा करण्यामागे महत्त्वाच्या असा २ पौराणिक कथा आहेत. पहिल्या कथेनुसार, महिषासुराने ब्रम्हदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडे वरदान मागितले होते की, विश्वातला कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवरील कोणी मनुष्य मला मारू शकणार नाही. या वरदानानंतर राक्षस असलेला महिषासुराने सर्वत्र दहशत माजवायला सुरुवात केली. त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवीने साक्षात शक्तीच्या रुपात जन्म घेतला. त्यानंतर दुर्गा देवी आणि महिषासुरामध्ये घमासान युद्ध झालं. तब्बल ९ दिवस चाललेल्या या युद्धात अखेर दहाव्या दिवशी देवीनं सर्व शक्ती एकटवून महिषासुराचा अंत केला. ज्यामुळे पृथ्वीवरचा उन्माद थांबला आणि सर्वत्र आंनदाचं वातावरण पसरलं. त्यामुळे दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा ( Navratri Festival) केला जातो.
Join Our WhatsApp Community