T.Raja Singh यांच्या घराची रेकी; इस्माइल आणि मोहम्मदला पकडले, मुंबई कनेक्शन उघड

४ संशयितांपैकी दोघे फरार, पोलिसांचा तपास सुरु

64
T.Raja Singh यांच्या घराची रेकी; इस्माइल आणि मोहम्मदला पकडले, मुंबई कनेक्शन उघड
T.Raja Singh यांच्या घराची रेकी; इस्माइल आणि मोहम्मदला पकडले, मुंबई कनेक्शन उघड

हैदराबाद गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे (Goshamahal Assembly constituency) भाजपचे आमदार टी राजा सिंह (T.Raja Singh) यांच्या घराची रेकी ४ संशयितांकडून केली जात होती. यातील २ संशयितांना पकडण्यात आले असून बाकीचे दोघे फरार झाले. स्थानिक नागरिकांनी ही रेकी करताना दोन संशयितांना पकडले. त्याची नावे मोहम्मद खाजा आणि शेख इस्माइल असे आहे. हे संशयित टी राजा सिंह यांच्या घराची छायाचित्र आणि व्हिडिओ बनवून मुंबईमधील अन्य कोणाला तरी पाठवत असल्याची माहिती आहे.

( हेही वाचा : Gayatri Mandir च्या जागेवर मशीद; VHP आक्रमक, कारवाई न झाल्यास करणार कारसेवा)

संशयितांच्या मोबाईलमध्ये टी राजा सिंह (T.Raja Singh) यांचे छायाचित्र सापडले. ही घटना दि.२७ आणि दि. २८ सप्टेंबरच्या रात्रीची आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी ४ संशयित रात्री २ वाजता सिंह (T.Raja Singh) यांच्या घराशेजारी फिरताना दिसले. त्यावेळी स्थानिक तरुणांनी ४ संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन जण फरार झाले. त्यानंतर झालेल्या तपासात दोघांच्या मोबाईलमध्ये सिंह (T.Raja Singh) यांच्या घराचे छायाचित्र काढलेली आढळली.

पिस्तुल आणि काडतूस पाहिल्याचा दावा

दरम्यान या प्रकरणातील संशयित शेख इस्माइल (३०) मूळचा हैदराबाद येथील अल्लापूर बोराबांदा परिसरातील रहिवासी आहे. तर मोहम्मद खाजा मूळाचा कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो १५ वर्षापूर्वी नोकरीच्या शोधात हैदराबाद येथे आला. त्यात टी राजा (T.Raja Singh) यांनी सांगितले की, व्हिडिओ आणि छायाचित्र मुंबईतील कटाशी संबंधित व्यक्तीला व्हॉट्सअॅपच्या साहाय्याने पाठवले जात होते. एका छायाचित्रात पिस्तुल आणि काडतूस ही पाहिल्याचा दावा टी राजा (T.Raja Singh) यांनी केला. तसेच २०१० आणि २०११ च्या दरम्यान अशाच प्रकारे ‘आयएसआयएस’शी (ISIS) संबंधित दहशतवाद्यांनी आपल्या घराची रेकी केली होती, अशी माहिती सिंह यांनी दिली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.