आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेवरील (Western Local) वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासी खोळंबले आहेत. ट्रेन ३० ते ३५ मिनिट विलंबाने धावत आहेत. चर्चगेट ते गोरेगाव डाऊन मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला असून याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
(हेही वाचा-Mahayuti : दादांना बाहेरचा रस्ता राणेच दाखवणार!)
मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनच्या विस्ताराचं पश्चिम रेल्वेकडून हाती घेण्यात आलं होतं. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. रेल्वेकडून या ठिकाणी मेजर ब्लॉक घेण्यात आला होता. त्यापैकी अजून 128 तासांचं काम बाकी आहे. रेल्वेच्या माहितीनुसार 4 ऑक्टोबरपर्यंत 150 लोकल रद्द होणार आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान 30 किमी प्रतितास वेगानं लोकल चालवल्या जातील, याचा परिणाम दिवसभरातील वेळापत्रकावर होणार असल्याची माहिती आहे. (Western Local)
(हेही वाचा-Mahayuti : दादांना बाहेरचा रस्ता राणेच दाखवणार!)
सहाव्या लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर मेल एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. त्यामुळं लोकलची संख्या वाढवण्याचा मार्ग देखील मोकळा होईल. पश्चिम रेल्वेच्या नियोजनानुसार सहावी लाईन डिसेंबर 2024 पर्यंत बोरिवलीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं चर्चगेट ते बोरिवली पर्यंत लोकल सेवेमध्ये सुधारणा होईल. (Western Local)
30 सप्टेंबरला शेवटच्या लोकलचं वेळापत्रक कसं असेल? (Western Local)
चर्चगेट-विरार लोकल : चर्चगेटहून शेवटची लोकल रात्री11.27 वाजता सुटेल ती विरारला 1.15 वाजता पोहोचेल.
चर्चगेट-अंधेरी लोकल
चर्चगेटहून अंधेरीसाठी लोकल 1.00 वाजता सुटेल ती 1.35 वाजता अंधेरीला पोहोचेल.
बोरिवली- चर्चगेट लोकल
बोरिवलीहून लोकल 00.10 वाजता सुटेल ती 01.15 ला चर्चगेटला पोहोचेल.
गोरेगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
गोरेगावहून 00.07 ला लोकल सुटेल ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 1.02 ला पोहोचेल.
विरार-बोरिवली लोकल
ही अतिरिक्त लोकल चालवली जाईल. विरारवरुन 03.25 ला सुटेल ती बोरिवलीत 4.00 वाजता पोहोचेल.
बोरिवली-चर्चगेट धिमी लोकल
अतिरिक्त लोकल बोरिवलीवरुन 04.25 सुटेल ती चर्चगेटला 05.30 वाजता पोहोचेल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community