HCL कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा धक्क्याने स्वच्छतागृहातच मृत्यू

138
HCL कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा धक्क्याने स्वच्छतागृहातच मृत्यू
HCL कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा धक्क्याने स्वच्छतागृहातच मृत्यू

नागपूरमध्ये (Nagpur) आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. HCL या कंपनीत काम करणाऱ्या ४० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू कंपनीच्या स्वच्छतागृहात झाला आहे. नितीन एडविन मायकल हे सिनीयर अ‍ॅनालिस्ट म्हणून कंपनीत काम करत होते. कंपनीच्या स्वच्छतागृहात ते गेले, त्यानंतर ते स्वच्छतागृहात पडले. ते काहीही हालचाल न करता पडले आहेत, हे पाहून त्यांना तातडीने नागपूरच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले; पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

(हेही वाचा – Western Local : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवासी खोळंबले! पश्चिम रेल्वेवरील १५० लोकल रद्द)

मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

नितीन मायकल एडविन मायकल यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून एडविन यांचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरनेस्टने (हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने) झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. नितीन यांच्यामागे त्यांची पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा असे कुटुंब आहे. या प्रकरणी HCL या कंपनीने दुःख व्यक्त केले आहे आणि ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

अ‍ॅना सबेस्टियन या तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हे वृत्त समोर आल्याने कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना येत असलेल्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.