First Women MIDC: उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा! नागपुरात महिलांसाठी एमआयडीसी

120
First Women MIDC: उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा! नागपुरात महिलांसाठी एमआयडीसी
First Women MIDC: उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा! नागपुरात महिलांसाठी एमआयडीसी

राज्यात गेल्या दोन वर्षांत झालेल्या औद्योगिक प्रगतीचा आढावा मांडण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यभरात ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ हा संवादात्मक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी नागपूरमधून झाली. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंटला झालेल्या कार्यक्रमादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. (First Women MIDC)

(हेही वाचा-Western Local : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवासी खोळंबले! पश्चिम रेल्वेवरील १५० लोकल रद्द)

‘राज्यातील पहिली महिला एमआयडीसी (First Women MIDC) कन्हान येथे होणार आहे. यासंदर्भातची अधिसूचना आचारसंहितेपूर्वी काढण्यात येईल,’ अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. ते म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जाताहेत, असादेखील प्रचार करण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत उद्योगांच्या पळवापळवीचे फेक नॅरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला मागे टाकत विदेशी गुंतवणुकीत पहिला क्रमांक गाठला आहे.’

(हेही वाचा- T.Raja Singh यांच्या घराची रेकी; इस्माइल आणि मोहम्मदला पकडले, मुंबई कनेक्शन उघड)

‘गडचिरोलीसारख्या माओवादग्रस्त जिल्ह्यात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. येत्या वर्षभरात हा जिल्हा माओवाद प्रभावित जिल्ह्याऐवजी उद्योगनगरी म्हणून उदयास येणार आहे. डावोस येथील सामंजस्य कराराच्या माध्यमातून ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.’ (First Women MIDC)

(हेही वाचा- Love Jihad व्हाया गोमांस, धर्मांतर; तीन प्रकरणे, शादाब, शहजाद, अरशद यांचा डाव)

सध्या पुढील मुख्यमंत्री कोण, यावरून बरीच वक्तव्ये सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा आहेत. अजित पवार गटानेदेखील मुख्यमंत्रिपदासाठी स्वारस्य दाखविले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उदय सामंत यांनी ‘महायुतीचे सरकार कायम राहावे हीच आम्हा सर्वांची इच्छा आहे. मुख्यमंत्री कोण, यावर नंतर निर्णय होईल,’ असे सामंतांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले. (First Women MIDC)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.