ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना त्यांच्या सिनेविश्वातील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला आहे. ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन (Mithun Chakraborty) यांना या सन्मान देण्यात येईल. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी हा सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत दादासाहेब फाळके पुरस्कारासंदर्भात ही अधिकृत घोषणा केली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी
मिथुन (Mithun Chakraborty) यांचा जन्म १६ जून १९५० रोजी कोलकाता याठिकाणी झाला. त्यांनी बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. त्यांच्या नावावर ३५०हून अधिक सिनेमे आहेत. अभिनयाशिवाय त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम केले असून, सध्या मिथुन राजकारणात विशेष सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले असून दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला आहे.
१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मात्र त्यांच्या करिअरची गाडी ‘डिस्को डान्सर’ या सिनेमामुळे रुळावर आली. त्यांनी आत्तापर्यंत ‘डिस्को डान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पांच’, ‘सहस’, ‘वरदात’, ‘बॉक्सर’, ‘प्यारी बहाना’, ‘प्रेम प्रतिज्ञा’,’ मुजरिम’ आणि ‘अग्निपथ’ सारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटात काम केले आहे. (Mithun Chakraborty)
Mithun Da’s remarkable cinematic journey inspires generations!
Honoured to announce that the Dadasaheb Phalke Selection Jury has decided to award legendary actor, Sh. Mithun Chakraborty Ji for his iconic contribution to Indian Cinema.
🗓️To be presented at the 70th National…
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 30, 2024
अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘मिथुन दा (Mithun Chakraborty) यांचा सिनेविश्वातील उल्लेखनील प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडकर्त्या ज्युरींनी हा पुरस्कार भारतीय सिनेमातील विलक्षण योगदानाबद्दल श्री. मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्याचे ठरवले, हे जाहीर करताना अत्यंत अभिमान वाटतो आहे.’
हेही पहा-
Join Our WhatsApp Community