Harry Brook : ‘या’ खेळाडूने मोडला विराट कोहली आणि एम. एस. धोनीचाही विक्रम 

Harry Brook : ब्रूकच्या कामगिरीनंतरही इंग्लंडचा पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाला 

118
Harry Brook : ‘या’ खेळाडूने मोडला विराट कोहली आणि एम. एस. धोनीचाही विक्रम 
Harry Brook : ‘या’ खेळाडूने मोडला विराट कोहली आणि एम. एस. धोनीचाही विक्रम 
  • ऋजुता लुकतुके 

इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करताना भारताचे विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंग धोनीलाही (M.S. Dhoni) मागे टाकलं आहे. हॅरी सध्या इंग्लिश संघाचा कर्णधार आहे. पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५२ चेंडूंत ७२ धावा करत इंग्लिश संघाला ३०८ अशी दमदार धावसंख्या उभारून दिली. या खेळीसह त्याने मालिकेत ३१२ धावा केल्या आहेत. एका बाबतीत भारताचे विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला त्याने मागे टाकलं आहे. (Harry Brook)

(हेही वाचा- Himanta Biswa Sarma म्हणाले, आम्हाला मुल्ला नको, डॉक्टर-इंजिनीअर हवेत)

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून त्याची आता वर्षी लागली आहे. इथं कर्णधारांची मैदानावरील प्रत्यक्ष कामगिरी गृहित धरली आहे. यापूर्वी विराट कोहलीने २०१९ च्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३१० धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूकच्या पूर्वी इयन मॉर्गन या इंग्लिश कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७८ धावा केल्या होत्या. (Harry Brook)

हॅरी ब्रूक – ३१२ धावा (इंग्लंड, २०२४)

विराट कोहली – ३१० धावा (भारत, २०१९)

महेंद्रसिंग धोनी – २८५ धावा (भारत, २००९)

इयन मॉर्गन – २७८ धावा (इंग्लंड, २०१५)

बाबर आझम – २७६ धावा (पाकिस्तान, २०२२)

(हेही वाचा- Nagpur Hit And Run Case : भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल )

२५ वर्षीय हॅरी ब्रूक इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी २०१० सालच्या मालिकेत मायकेल वॉनने ३७५ धावा केल्या होत्या. आताच्या मालिकेत हॅरी ब्रूकच्या ७२ धावांमुळे इंग्लंडने पहिली फलंदाजी करताना ५० षटकांत ३०८ धावा केल्या. पण, ऑस्ट्रेलियाच्या २० षटकांत २ बाद १६५ धावा झाल्या असताना पाऊस सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमांचा आधार घेत ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ ने जिंकली. (Harry Brook)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.