शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूवरून (Shivdi – Navasheva Atal Setu) एका व्यक्तीने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवडी न्हावाशेवा अटल सेतू वरील नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरील (किलोमीटर क्रमांक ८.५ या ठिकाणी) लाल रंगाची सुजुकी कंपणीची ब्रेजा क्रमांक (एमएच०१-डिटी-९१८८) ही कार बराच वेळेपासून उभी असल्याची माहिती मुंबई वाहतूक (Mumbai police) पोलिसांना मिळाली. (Atal Setu Suicide Case)
वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची तपासणी केली असता कारमध्ये कोणीही आढळून आले नाही. दरम्यान ही माहिती शिवडी पोलिसांना देण्यात आली. शिवडी पोलिसांनी अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक व्यक्ती सकाळी ९:५७ च्या दरम्यान अटल सेतू पुलावरुन जात असताना लाल रंगाचा ब्रेजा कारने या पुलावर थांबली आणि काही कळण्याच्या आत त्याने कारमधून बाहेर पडून अटल सेतू वरून समुद्रात उडी घेतली. शिवडी पोलिसांनी (Shivadi Police) तात्काळ अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात उडी मारणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला, सोमवारी दुपारी उशिरापर्यत शोध घेण्यात येत होता. (Atal Setu Suicide Case)
हेही वाचा –