Jannik Sinner Doping Case : यानिक सिनरला वाडाची नोटीस, प्रतिस्पर्धी कार्लोस अल्काराझ म्हणतो, हे बरं नव्हे!

Jannik Sinner Doping Case : उत्तेजक चाचणीत यानिक सिनर एकदा दोषी आढळला आहे

90
ATP Masters Final : टैलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये हरवून यानिक सिनरचा एटीपी मास्टर्सवर कब्जा
  • ऋजुता लुकतुके 

टेनिसमध्ये सध्या जागतिक स्तरावर क्रमवारीत अव्वल असलेल्या यानिक सिनरला गेल्याच आठवड्यात उत्तेजक चाचणी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. आंतररष्ट्रीय क्रीडा लवादाने त्याला या प्रकरणी निर्दोष ठरवलं आहे. पण, आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी पथक अर्थात वाडाने या निर्णया विरुद्ध अपील करण्याचं ठरवलं आहे. क्रीडा लवादाकडेच दाद मागताना त्यांनी सिनरवर दोन वर्षांच्या बंदीची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अशावेळी सिनरचा साथीदार आणि ४ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेला कार्लोस अल्काराझने यानिक सिनरची बाजू घेतली आहे. (Jannik Sinner Doping Case)

(हेही वाचा- Atal Setu Suicide Case: अटल सेतूवरून एकाची आत्महत्या, मृतदेहाचा शोध सुरू )

‘टेनिससाठी हे वाईट आहे. झालं ते चांगलं झालं नाही. पण, मला सिनरबद्दल सहानुभूती वाटते. तो आता कशातून जात असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. मी त्याच्या बाजूने आहे,’ असं अल्काराझने बोलून दाखवलं. यानिकला अल्काराझबरोबरच माजी दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर आणि राफेल नदालनेही पाठिंबा देऊ केला आहे. (Jannik Sinner Doping Case)

यावर्षी मार्च महिन्यात यानिक सिनरच्या झालेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत क्लोस्टेबल हे उत्तेजक सापडलं होतं. त्यानंतर वाडाने सिनरला कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर स्पष्टीकरण देताना सिनरने फीजिओकडून मारलेल्या एका स्प्रेमधून हे द्रव्य शरीरात गेल्याचं सांगितलं होतं. पायाला छोटा कट होता. त्या सामन्यादरम्यान उपचार करताना फीजिओनं एक स्प्रे मारला. त्यानंतर पायावर मसाजही केला. त्यामुळे हे द्रव्य शरीरात गेल्याचं सिनरने आंतरराष्ट्रीय टेनिस असोसिएशनला कळवलं होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या इंटिग्रिटी संस्थेनं सिनरचं स्पष्टीकरण मान्य करत त्याला पॅरिस ऑलिम्पिक बरोबरच इतर स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली होती. (Jannik Sinner Doping Case)

(हेही वाचा- Harry Brook : ‘या’ खेळाडूने मोडला विराट कोहली आणि एम. एस. धोनीचाही विक्रम )

पण, वाडाने यानिक सिनर विरोधात आपला दावा कायम ठेवला आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. याचा परिणाम यानिक सिनरच्या कामगिरीवरही होत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे त्याने माघार घेतली होती. तर वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर फ्रेंच आणि विम्बल्डन या ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये तो उपान्त्य फेरीत पराभूत झाला आहे. (Jannik Sinner Doping Case)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.