CBI ची देशात ३२ ठिकाणी छापेमारी, पुण्यात १० आणि इतरत्र १६ म्होरक्यांना अटक

सायबर गुन्हेगारांविरोधात सीबीआयची मोठी कारवाई

84
CBI ची देशात ३२ ठिकाणी छापेमारी, पुण्यात १० आणि इतरत्र १६ म्होरक्यांना अटक
CBI ची देशात ३२ ठिकाणी छापेमारी, पुण्यात १० आणि इतरत्र १६ म्होरक्यांना अटक

गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे सायबर क्राईमसारख्या (Cyber Crime) गुन्ह्यांमध्ये देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे या गुन्हेगारीला रोखण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांकडून वेळोवेळी केला जातो. त्यातच जगभरातील आणि देशातील नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून पैसे उकळणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात (Cyber Crime) सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी सीबीआयने देशात ३२ ठिकाणी छापेमारी केली. ज्यानंतर देशभरात सायबर फ्रॅाडच्या माध्यमातून लोकांना फसवून पैसे उकळणाऱ्या साखळीतील १७० जणांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यातील २६ म्होरक्यांना अटक करण्यात आली असून विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune) १० जणांना अटक केली आहे.

(हेही वाचा : Anis : जादूटोणा कायद्याची शासकीय समिती त्वरित बरखास्त करा; समस्त वारकरी संप्रदायाची मागणी) 

कोणत्या शहरात छापेमारी? कुठून किती जणांना अटक?

सीबीआयने (CBI) पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि विशाखापट्टणममधील ३२ ठिकाणी छापे टाकले. दि. २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री सीबीआयकडून ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत सीबीआयला (CBI) आढळले की, चार कॉल सेंटरच्या साहय्याने १७० लोक ऑनलाईन गुन्हेगारीत सहभागी होते. यातील प्रमुख २६ जणांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. त्यात पुण्यातून (Pune) १० जणांना, हैदराबादमधून (Hyderabad) ५ आणि विशाखापट्टणममधून (Visakhapatnam) ११ जणांना अटक करण्यात आली आहे. तरी सीबीआय या २६ जणांची कसून चौकशी करत आहे. ज्यामुळे त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा शोध घेता येईल.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.