Conversion of Hindus : धर्मांतर रोखण्यासाठी गेलेल्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक; ‘बकरी घ्या आणि ख्रिश्चन व्हा’ ख्रिस्त्यांचे आमिष

चंगाई सभेच्या नावाखाली धर्मांतरणाचा डाव

58
Conversion of Hindus : धर्मांतर रोखण्यासाठी गेलेल्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक; 'बकरी घ्या आणि ख्रिश्चन व्हा' ख्रिस्त्यांचे आमिष
Conversion of Hindus : धर्मांतर रोखण्यासाठी गेलेल्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक; 'बकरी घ्या आणि ख्रिश्चन व्हा' ख्रिस्त्यांचे आमिष

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हिंदूंचे (Hindu) ख्रिश्चन धर्मात धर्मातर करण्याचे (Conversion of Hindus) प्रकरण उघडकीस आले आहे. याठिकाणी चंगाई सभेच्या (Changai Sabha) नावाखाली हिंदूंच्या धर्मांतरणाचा डाव आखण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. गरिब हिंदूंना (Hindu) बकरी देण्याचे आमिष दाखवून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर (Conversion of Hindus) करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळी धर्मांतर रोखण्यासाठी गेलेल्या हिंदू संघटनेच्या (Hindu organization)कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली आहे.

(हेही वाचा : Cabinet Meeting : निवडणूक आचारसंहितेच्या धास्तीने निर्णयांचा धडाका; मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ४० निर्णय

ख्रिस्ती धर्माचे कौतुक मात्र हिंदू धर्माचे वावडे

ही घटना दि. २९ सप्टेंबर रोजी प्रयागराज जिल्ह्याच्या सरायइनायत पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दि. २९ सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे यासंबंधित तक्रार दाखल केली. तक्रारीत सांगितले की, रविवारी दुपारी १२ वाजता सरपतीपुर गावात चंगाई सभेच्या(Changai Sabha) नावाखाली लोक जमा झाले होते. त्यातील काही जण ख्रिस्ती धर्माचे कौतुक करत हिंदूं (Hindu) धर्माची बदनामी करत होते. तसेच हिंदू (Hindu) देवी-देवतांबद्दल असभ्य भाषेत टीका करत होते.

१० अज्ञातांकडून दगडफेक

दरम्यान हिंदूंचे धर्मांतर (Conversion of Hindus) करणारे आरोपी प्रयागराज येथील रहिवासी आहेत. त्यावेळी हिंदू संघटनांनी विरोध दर्शवताच हिंदू संघटनांच्या (Hindu organization) कार्यकर्त्यांवर १० अज्ञातांनी दगडफेक केली. त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरु असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०२ आणि १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.