विदर्भातील (Vidarbha) काही जागांपैकी अहेरी या विधानसभा मतदार संघावरून महाविकास आघाडीत, कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये, बिघाडी होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अहेरीवर दावा केला असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या भाग्यश्री आत्राम यांच्यावरही टीका केली. आत्राम कुटुंब धोकेबाज असून त्यांना या मतदार संघावर आपली सत्ता कायम ठेवायची असल्याचा आरोप वडेट्टीवार (Vijay Wadettuwar) यांनी केला. (Aheri)
भाग्यश्री यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत
गेल्या आठ विधानसभा निवडणुकीत, 1985 पासून, अहेरी विधानसभा मतदार संघावर आत्राम कुटुंबाचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraobaba Aatram) निवडून आले. सध्या धर्मरावबाबा आत्राम अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असून त्यांची कन्या भाग्यश्री यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या मतदार संघात आत्राम पिता विरुद्ध कन्या अशी लढत होणार असल्याची चर्चा विदर्भात होत आहे. (Aheri)
(हेही वाचा –Fake Currency : अनुपम खेर यांचा फोटो छापलेल्या बनावट नोटा देऊन खरेदी केले २१०० ग्रॅम सोने )
दोघे आत्राम धोकेबाज
दरम्यान, अहेरी येथे रविवारी कॉँग्रेस मेळावा आयोजित करण्यात आला आणि या मतदार संघावर कॉँग्रेसने दावा ठोकला. या मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार (Vijay Wadettuwar) यांनी आत्राम कुटुंबावर सडकून टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, “आलटून पालटून सत्ता यांच्याच घरात.. आधी काका मग पुतण्या, मग पुतण्या मग काका.. आता मुलगी म्हणते मी वाघीन आहे, माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर बघून घेईन. मी मारल्यासारखं करतो.. तू रडल्यासारखं कर.. हे दोघे धोकेबाज असून घरात सत्ता ठेवण्यासाठी जनतेला धोके देत आहेत, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो,” असे वडेट्टीवार (Vijay Wadettuwar) म्हणाले.
(हेही वाचा – Uddhav Thackeray स्वतःला ‘पेद्रे’ का म्हणाले?)
कॉँग्रेसला चांगले मतदान
कॉँग्रेस आणि शरद पवार (NCP Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी (NCP) हे महाविकास आघाडीचा भाग असूनही वडेट्टीवार यांनी भाग्यश्री आत्राम यांच्यासाठी मतदार संघ सोडायला विरोध केल्याचे सांगण्यात आले. अहेरी मतदार संघातून चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील कॉँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना चांगली मते मिळाल्याने हा मतदार संघ कॉँग्रेसला सोडण्यात यावा, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी केल्याने महाविकास आघाडीत यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Aheri)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community