विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणार्या सर्व धरणांमधील पाणी साठा आता जवळपास शंभर टक्के जमा असून शंभर टक्के पाणी साठ्यासाठी शुन्य पूर्णांक ६८ टक्के पाण्याची गरज आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणी अधिक आहे. आतापर्यंत ३० ऑक्टोबर पर्यंत ९९.३२ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला असून पुढील वर्षभराच्या पाण्याची चिंता मुंबईकरांची मिटली आहे. मात्र, तलाव तुडुंब भरले जात असले तरी पाण्याचे बाष्पीभवन, गळती आदींमुळे पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते, त्यामुळे तलाव जरी भरले असले तरी मुंबईकरांसमोर पाण्याचा वापर जपून करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून केल्यास भविष्यात मुंबईकरांवर तूट निर्माण होऊन कोणतीही कपात करण्याची गरज भासणार नाही. (BMC)
मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणार्या अप्पर वैतरणा(Upper Vaitarna), मोडकसागर(Modaksagar), तानसा(Tansa), मध्य वैतरणा(madhya Vaitarna), भातसा (Bhatsa), विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे १ ऑक्टोबर रोजी पाण्याचा जो साठा असेल त्यावर मुंबईकरांच्या वर्षभराचे नियोजन केले जाते. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा १ ऑक्टोबर पर्यंत असणे आवश्यक असते. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२४ रोजी १४ लाख ३७ हजार ५०४ दशलक्ष लिटर्सचा साठा आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर पर्यंत जमा झालेल्या एकूण पाण्याच्या साठ्या तुलनेत दहा हजार दशलक्ष लिटर्स अर्थात शुन्य पूर्णांक ६८ टक्के एवढा पाणी साठा कमी आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरचा जर आढावा घेतला तर तीन दिवसांच्या पाणी पुरवठा होईल एवढा पाणी साठा कमी आहे, त्यामुळे १ ऑक्टोबरपर्यंत एका दिवसांत हा पाणी साठा जेवढा वाढेल त्यातही मुंबईकरांची (Mumbai) वर्षभराची तहान पूर्णपणे भागवणारा एवढा हा पाणी साठा असेल. (BMC)
मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरण तुडुंब भरले असले तरी मुंबईकरांनो, धो धो पाणी वापरून भविष्यात पाणीकपातीला सामोरे जाण्याची वेळ आणू नका. जरी आज तलाव व धरणे तुडुंब भरले असले तरी पाणी गळती आणि बाष्पीभवन यामुळे पाण्याची तुट निर्माण होऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने (BMC) वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जात असले तरी मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करून भविष्यात पाणीकपातीचे संक्रांत टाळण्याचा प्रयत्न करता येईल. त्यामुळे मुंबईकरांसमोर यापुढे मोठी जबाबदारी असेल ती म्हणजे पाण्याचा वापर जपून करणे. त्यामुळे मुंबईकरांनो, तलाव भरले तरी पाण्याचा वापर शक्यतो काटकरीने करा आणि पाणी कपात लावण्याची वेळ महापालिकेवर (BMC) आणू नका, हाच संदेश देता येईल.
३० ऑक्टोबरपर्यंतचा पाणी साठा
२०२४ १४ लाख ३७ हजार ५०४ दशलक्ष लिटर्स (९९.३२ टक्के )
२०२३ : १४ लाख ३६ हजार १८३ दशलक्ष लिटर्स (९९.२३ टक्के)
२०२२: १४लाख २६ हजार ५०९दशलक्ष लिटर्स (९८.५६टक्के)
Join Our WhatsApp Community