Project Mumbai : ‘या’ रेल्वे स्थानकांचे होणार सौंदर्यीकरण; मुंबईकरांना घेता येणार सहभाग

२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

147
Project Mumbai : 'या' रेल्वे स्थानकांचे होणार सौंदर्यीकरण; मुंबईकरांना घेता येणार सहभाग
Project Mumbai : 'या' रेल्वे स्थानकांचे होणार सौंदर्यीकरण; मुंबईकरांना घेता येणार सहभाग

मुंबई आणि रेल्वे स्थानकांचा जवळचा संबंध आहे. ‘प्रोजेक्ट मुंबई’ (Project Mumbai) या उपक्रमाच्या माध्यमातून लोकसहभागातून १३ स्थानकांचा कायापालट करण्याचे ठरवण्यात आले आहे. २ ते १५ ऑक्टोबर दरम्यान हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत चुनाभट्टी, कॉटन ग्रीन, करी रोड, डॉकयार्ड रोड, कळवा, किंग्ज सर्कल, मस्जिद बंदर, नाहुर, रे रोड, शिवडी, ठाकुर्ली आणि टिळकनगर या स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – उल्‍हास नदीत सोडले सांडपाणी; Thane महानगरपालिकेला १०२ कोटी रुपयांचा दंड)

विशेष म्हणजे या उपक्रमांत स्थानिकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक चित्रकार, कलाकारांशी संपर्क साधण्यात आल्याचे ‘प्रोजेक्ट मुंबई’तर्फे सांगण्यात आले. हे कलाकार मुंबईच्या वेशीवर राहतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ, तसेच आर्थिक लाभ असे दोन्ही फायदे या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एखाद्या स्थानकाच्या सौंदर्याकरणात जेव्हा स्थानिक सहभागी होतात, तेव्हा त्यांच्याकडून स्वच्छतेसाठीही अधिक प्रयत्न केले जातात, याच विचारातून हा उपक्रम हाती घेतला आहे.

(हेही वाचा – BMC : मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन, तलाव तुंडुब भरले तरीही….)

‘प्रोजेक्ट मुंबई’चे (Project Mumbai) संस्थापक शिशिर जोशी याविषयी म्हणाले, कलाकारांना आर्थिक मदतीची गरज असते. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांनाही चालना मिळत आहे. त्यांची कला व्यापक कॅनव्हासवर दाखवण्याची संधी मिळत आहे. त्यांना पाठिंबा देणेही आवश्यक आहे. हा प्रकल्प केवळ मुंबईच्या सौंदर्यीकरणासंदर्भातील नाही, तर कलाकारांचे जीवनमान उंचावण्यासाठीचा प्रयत्न आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.