-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आणि कमीत कमी डावांत त्याने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ६२३ डावांमध्ये २७,००० धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने ही मजल मारण्यासाठी ५९४ डाव म्हणजे सगळ्यात कमी वेळ घेतला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील विराटची कामगिरी अधिक उजवी आहे. या प्रकारात त्याने २९५ एकदिवसीय सामन्यांत १३,९०६ धावा जमवल्या आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८,९१८ धावा आहेत. तर टी-२० प्रकारातही ४,१४४ धावा त्याने जमवल्या आहेत.
Another day at office, another milestone breached!@imVkohli now has 27000 runs in international cricket 👏👏
He is the fourth player and second Indian to achieve this feat!#INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ijXWfi5v7O
— BCCI (@BCCI) September 30, 2024
(हेही वाचा – Tadoba Tiger Reserve चे दरवाजे २ ऑक्टोबरपासून उघडणार)
विराट कोहलीने (Virat Kohli) तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. या विक्रमामुळेही निवडक पाच फलंदाजांमध्ये त्याची वर्णी लागणार आहे. अढळ निर्धार आणि धावांसाठी प्रचंड भूक यासाठी विराट क्रिकेटमध्ये ओळखला जातो. २४ वर्षांच्या कारकीर्दीत ८८ आंतरराष्ट्रीय शतकंही त्याच्या नावावर आहेत. विराट कोहलीने २७,००० आंतरराष्ट्रीय धावा ५९४ डावांत पूर्ण केल्या. सचिनने त्यासाठी ६२३ डाव घेतले होते. तर कुमार संगकाराने ६४८ डावांत ही मजल मारली होती.
To-Do List:
SHATTERING RECORDS 🫡
<end of list>Another day, another VK milestone. Fastest to 2️⃣7️⃣,0️⃣0️⃣0️⃣ International Runs. ⚡️#PlayBold #TeamIndia #INDvBAN #ViratKohli pic.twitter.com/zahBAGlwJo
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 30, 2024
(हेही वाचा – Sharad Pawar राज्यातील मिनी औरंगजेब; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल)
२७,००० आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पाँटिंगही (Ricky Ponting) आहे. त्याने ६५० डावांमध्ये हा टप्पा ओलांडला होता. थोडक्यात, सर्वात जलद २७,००० धावा करताना विराट आणखी काही दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. शिस्त आणि तंदुरुस्तीच्या जोरावर विराटने एवढी प्रदीर्घ कारकीर्द घडवली आहे. आणि वयाच्या ३५ व्या वर्षीही तो भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community