ब्रिटिश रॉक बँड Coldplay Ticket विक्री संदर्भात ‘बुकमाय शो’ कंपनीच्या सीईओची ७ तास चौकशी

98
https://www.marathi.hindusthanpost.com/uncategorized/7-hours-questioning-of-the-ceo-of-bookmy-show-company-regarding-british-rock-band-coldplay-ticket-sales/
https://www.marathi.hindusthanpost.com/uncategorized/7-hours-questioning-of-the-ceo-of-bookmy-show-company-regarding-british-rock-band-coldplay-ticket-sales/

मुंबई पोलिसांनी ‘बुक माय शो’ (बुक माय शो) चे सीईओ आशिष हेमराजानी (CEO Ashish Hemrajani) यांना जानेवारी २०२५ मध्ये शहरात झालेल्या ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूरच्या तिकिटांच्या कथित काळाबाजारा (Coldplay Ticket Black Market) प्रकरणी चौकशीसाठी दुसऱ्यांदा समन्स बजावले होते.मात्र चौकशीसाठी आशिष हेमराजानी ऐवजी कंपनीचे सीओओ अनिल माखिजा यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हजेरी लावली. आर्थिक गुन्हे शाखेने माखीजा यांची सात तास चौकशी करून त्यांना सोडण्यात आले आहे. (Coldplay Ticket)

नवीमुंबईच्या डी. वाय .पाटील स्टेडियम येथे १९ ते २१ जानेवारी २०२५ रोजी सादर होणाऱ्या ब्रिटीश बँडच्या तिकिटांचा
ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर काळाबाजार केल्याचा आरोप करणारे वकील अमित व्यास यांच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) प्राथमिक तपास सुरू केला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘बुक माय शो’ या ऑनलाईन तिकिट विक्री अँप कंपनीचे सीईओ आशिष हेमराजानी यांना २७ सप्टेंबर रोजी पहिले समन्स पाठवले होते. परंतु हेमराजानी हे २८ सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेत हजर न झाल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी दुसरे समन्स पाठवले होते, सोमवारी हेमराजनी यांना आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या २७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण)

परंतु हेमराजनी हे सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजर न राहता कंपनीच्या सीओओ अनिल माखीजा यांना चौकशीला पाठविण्यात आले होते, सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अनिल माखीजा हे मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी साठी आले होते. आर्थिक गुन्हे शाखेने सात तास चौकशी केल्यानंतर माखीजा यांना सोडण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने माखीजा यांचा जबाब नोंदवून त्याना या प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे घेऊन बोलविन्याय आले आहे. (Coldplay Ticket)

ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड या ब्रिटीश बँडच्या तिकिटांचा ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर काळाबाजार केल्याचा आरोप करणारे वकील अमित व्यास यांच्या तक्रारीच्या आधारे केला की अडीज हजार ते १२ हजार रुपयांपर्यंतच्या तिकिटांच्या किमती थर्ड पार्टी विक्रेते आणि स्कॅल्पर्सकडून जास्त किमतीत विकल्या जात आहेत. तथापि, बुक माय शो ने हे सर्व आरोप फेटाळून लावत तिकीट स्कॅल्पिंगचा निषेध केला आणि सांगितले की त्याचा कोणत्याही पुनर्विक्रेत्याशी संबंध नाही . याप्रकरणी तिकीट प्लॅटफॉर्मने पोलिस तक्रारही दाखल केली होती शिवाय, कंपनीने एक सल्लागार जारी केला, बँडच्या प्रामाणिक संरक्षकांना तृतीय पक्ष विक्रेत्यांकडून तिकिटे खरेदी करू नयेत, बनावट तिकिटांचा धोका आणि संभाव्य आर्थिक नुकसान होण्याचा इशारा दिला. (Coldplay Ticket)

आठ वर्षानंतर कोल्डप्ले 

आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर कोल्डप्ले भारतात सादर होणार आहे. २०१६ मध्ये ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये या बँडने भारतात शेवटचे पसादरीकरण केले होते. बँडच्या कामगिरीच्या घोषणेचे जोरदार जल्लोषात स्वागत होत असताना, तिकीट खरेदीची प्रक्रिया निराशाजनक होती. तिकिटांची विक्री सुरू होण्यापूर्वीच, चाहत्यांना सर्व्हर क्रॅश आणि दीर्घ प्रतीक्षा कालावधीचा सामना करावा लागला, विक्रीच्या दिवशी अंदाजे १.३ कोटी लोकांनी वेबसाइट आणि ॲपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.