Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने ‘या’ बाबतीत विरेंद्र सेहवागला टाकलं मागे

यशस्वी जैस्वालने ३१ चेंडूंत कसोटी अर्धशतक केलं आहे.

58
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने ‘या’ बाबतीत विरेंद्र सेहवागला टाकलं मागे
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने ‘या’ बाबतीत विरेंद्र सेहवागला टाकलं मागे
  • ऋजुता लुकतुके

भारताचा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) भारतासाठी जलद कसोटी अर्धशतक झळकावण्याचा मान पटकावला आहे. या बाबतीत विरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) त्याने मागे टाकलं आहे. कानपूरच्या ग्रीनपार्कवर खेळताना भारतीय संधानेही सर्वात जलद कसोटी अर्धशतक आणि सर्वात जलद कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. दोन सत्रांमध्येच २८५ धावा करताना भारतीय संघाने बॅझबॉल क्रिकेटचा अविष्कारच घडवून आणला.

(हेही वाचा – Irani Cup 2024 : सर्फराझ, यश दयाल व ध्रुव जुरेल भारतीय संघातून मुक्त, इराणी चषक खेळणार)

यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) ३१ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यापूर्वी विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) २००८ मध्ये इंग्लंड विरुद्ध ३२ चेंडूंत अर्धशतक ठोकलं होतं. युवा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आता सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. सर्वात जलद अर्धशतकाचा मान हा रिषभ पंतला जातो. २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध रिषभने हा विक्रम केला होता. आणि त्याने दिग्गज क्रिकेटपटू कपिल देवचा विक्रम मागे टाकला होता. कपिल देवने १९८२ मध्ये कराचीत पाकिस्तान विरुद्ध खेळताना ३० चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं. यशस्वी जैस्वालने ५१ चेंडूंत ७२ धावा केल्या.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या २७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण)

भारतीय संघानेही कानपूरमध्ये कसोटी क्रिकेटमधील काही विक्रम नव्याने लिहिले. पहिल्या तीन षटकांतच भारताने ४५ धावा फलकावर लावल्या होत्या. आणि अर्धशतकी मजल भारतीय संघाने १९ चेंडूंतच मारली. तर शतकी मजल १०.१ षटकांत म्हणजेच ६१ चेंडूतच मारली. जलद शतकाच्या बाबतीत भारतीय संघाने आपलाच गेल्यावर्षी रचलेला विक्रम मागे टाकला. गेल्यावर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय संघाने १२.२ षटकांत शतकी मजल मारली होती. तर भारतीय संघाने एकूण ९ बाद २८५ धावा केल्या त्या ३४.४ षटकांत यात भारतीय संघाने ८.३४ धावांची धावगती राखली होती. हा ही एक विक्रमच आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने २०१७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सिडनी कसोटीत ७.२२ धावगती राखली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.