जुलै २०२३ मध्ये सर्वेाच्च न्यायालयाने काही न्यायवृंदांची शिफारस केली. त्यानंतर केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपतींनी दि. २५ जुलै २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायामूर्तींच्या (Chief Justice Of Bombay High Court ) नावावर शिक्कामोर्तब करत अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनंतर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती केली.
त्यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड, न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायवृदांने न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय (Devendra Kumar Upadhyaya) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती (Chief Justice Of Bombay High Court) पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
देवेंद्र उपाध्याय यांच्याविषयी
देवेंद्र उपाध्याय यांचा जन्म मस्कराय, जिल्हा आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश येथे १६ जून १९६५ येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्विन तालुकदार महाविद्यालय, लखनौ येथे झाले. त्यांनी १९९१ मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी (LL.B.) संपादन केली. . ११ मे १९९१ रोजी वकील म्हणून त्यांनी नावनोंदणी केली आणि वडिलांच्या चेंबरमध्ये सामील झाले.
दरम्यान उपाध्याय (Devendra Kumar Upadhyaya) यांना उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य स्थायी वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. मे २००७ मध्ये आणि अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती होईपर्यंत ते पद सांभाळले. २१ नोव्हेंबर २०११ रोजी अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि ६ ऑगस्ट २०१३ रोजी अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यानंतर २८ मार्च २०२३ रोजी लखनौ खंडपीठाचे वरिष्ठ न्यायाधीश बनले. पुढे २९ जुलै २०२३ रोजी देवेंद्र उपाध्याय(Devendra Kumar Upadhyaya) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामूर्ती (Chief Justice Of Bombay High Court ) म्हणून शपथ घेतली.