पुण्यात मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन सात पोलिस ठाण्यांचा अखेर श्रीगणेशा होणार आहे. दहा दिवसांत या पोलिस ठाण्यांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. यासाठी नवीन 816 पोलिस अधिकारी, कर्मचारी मिळणार आहेत. तर पायाभूत सोई-सुविधांसाठी 59 कोटी 59 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. अंतिम प्रशासकीय मंजुरी या सर्व पोलीस ठाण्यांना मिळाली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी दिली. त्यामुळे नवीन पोलीस ठाण्यांचा प्रश्न आचारसंहितेपूर्वी मार्गी लागणार आहे. (Pune Police)
(हेही वाचा – Chief Justice Of Bombay High Court : सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण?)
आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलीस ठाणे सुरू होणार आहेत. पोलिस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ (Bharti University), सिंहगड रोड, चतुःश्रृंगी, लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी आणि कोंढवा या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून तर पुणे ग्रामीणमधील (Pune Rural Police) हवेली या पोलिस ठाण्याचा काही भाग समाविष्ट करून या नवीन सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. (Pune Police)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community