इंदापूरचे Harshvardhan Patil यांची स्थिती ‘न घर का, न घाट का’

302
इंदापूरचे Harshvardhan Patil यांची स्थिती ‘न घर का, न घाट का’
  • खास प्रतिनिधी

भाजपाचे कुंपणावरील नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची अवस्था ‘न घर का, न घाट का’ अशी झाली तर आश्चर्य वाटू नये.

दोन वेळा पराभूत

इंदापूरचे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. २०१४ मध्ये राज्यातील सगळे मोठे पक्ष विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढले. तेव्हा पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा १४,००० मतांनी पराभव केला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीयआधी पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपात प्रवेश केला आणि इंदापूरमधून पुन्हा उमेदवारी मिळवली. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही भरणे यांनी त्यांचा पुन्हा पराभव केला मात्र यावेळी भरणे यांचे मताधिक्य १४,००० वरून ३,००० पर्यंत खाली आले.

(हेही वाचा – Badlapur Rape Case प्रकरणी शाळेच्या विश्वस्तांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला)

पराभव करणारा पक्ष फुटला

पाटील (Harshvardhan Patil) यांचा पराभव करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता एकसंघ राहिला नाही. पक्षाची दोन शकले झाली आणि भरणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेस आणि भाजपामधून उमेदवारी मिळूनही पराभव झाल्याने आता पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली असून ते कधीही राष्ट्रवादीची (शप) तुतारी हाती घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.

आयात उमेदवार नको

या चर्चेमुळे इंदापूरमधील स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले असून आयात उमेदवार या मतदारसंघात देऊ नये, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी प्रवीण माने, दशरथ माने, आप्पासाहेब जगदाळे यांनी कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेऊन केली. कोणीही स्थानिक कार्यकर्ता उमेदवार म्हणून द्यावा, मात्र बाहेरचा नको, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

(हेही वाचा – Supreme Court : अतिक्रमणाच्या विरोधातील बुलडोझर कारवाई सर्व नागरिकांसाठी समान, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश)

भावनांचा विचार करणार

यावर शरद पवार यांनीही त्यांना आश्वासित करत कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल, असा शब्द दिला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आणि राष्ट्रवादीकडूनही स्थानिकांचा विरोध, यामुळे ‘न घर का, न घाट का’ अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे नाव राज्यपाल नियुक्त १२ उमेदवारांमध्ये विचाराधीन होते, मात्र शरद पवार यांच्या भेटीमुळे तेही मागे पडल्याची चर्चा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.