Love Jihad : आनंद असल्याचे भासवणाऱ्या आलिमच्या वासनेची ‘ती’ ठरली शिकार, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

विदेशी फंडिंग मिळत असल्याचा न्यायालयाचा संशय

157
Love Jihad : आनंद असल्याचे भासवणाऱ्या आलिमच्या वासनेची 'ती' ठरली शिकार, न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा
Love Jihad : आनंद असल्याचे भासवणाऱ्या आलिमच्या वासनेची 'ती' ठरली शिकार, न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील फास्ट ट्रॅक कोर्टाने दि.३० सप्टेंबर रोजी लव्ह जिहादच्या (Love Jihad ) एका प्रकरणात मोहम्मद आलिमला (Mohammad Alim) जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. तसेच आरोपीवर १ लाख रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर मोहम्मद आलिमला(Mohammad Alim) साथ देणाऱ्या त्याचा अब्बा साबिर यालाही २ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

(हेही वाचा :  Naresh Mhaske यांची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका; म्हणाले… )

दरम्यान न्यायालयाने सुनावणीत भारतात पाकिस्तान आणि बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात केसमध्ये बचाव पक्षाच्या असंतोषजनक तथ्यांनी अखेर न्यायालयाने आलिम (Mohammad Alim) आणि त्याचा अब्बा साबिर याला शिक्षा सुनावली. यावेळी न्यायाधीश दिवाकर यांनी या प्रकरणात विदेशी फंडिंग मिळत असल्याचा संशयही व्यक्त केला. तसेच यासारख्या प्रकरणांवर वेळीच अंकुश ठेवला गेला नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ही न्यायालयाने सांगितले. (Love Jihad )

संपूर्ण प्रकरण काय?

हे संपूर्ण प्रकरण २०२२ सालाचं आहे. त्यावेळी आलिमने स्वत: आनंद असल्याचे सांगत हिंदू (Hindu) तरुणीशी मैत्री केली. (Love Jihad ) तो हातात दोरा बांधत आणि मंदिरातही जात असे. पीडित तरुण कॅाम्प्युटर क्लासला जात असताना आलिम तिचा पाठलाग करत. दि. १३ मार्च २०२२ मध्ये आलिमने (Mohammad Alim) हिंदू (Hindu) तरुणीचा कपाळात सिंदुर भरत बनाव केला. त्यानंतर पीडितेवर बलात्कार केला. मात्र पीडिता जेव्हा गरोदर राहिले तेव्हा तिने आलिमवर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. परंतु आलिमने (Mohammad Alim) नकार देत पीडितेचा गर्भपात करायला लावला.

मे २०२३ ला पीडिता आलिमच्या (Mohammad Alim) घरी गेली. तेव्हा तिला आलिम मुस्लिम असल्याचे लक्षात आले. जेव्हा तिने घडलेला प्रकार आलिमच्या (Mohammad Alim) कुटुबियांना सांगितला तेव्हा त्यांनीच पीडितेला मारहाण केली. तसेच आरोपीच्या अब्बा साबिरने पीडितेला निकाहासाठी इस्लाम कबूल करण्याचा सल्ला दिला. मात्र तरुणीने नकार देत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीला अटक केली. त्यानंतर कोर्टामध्ये चार्टशीट दाखल करण्यात आली. (Love Jihad )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.