Pollution : प्रदूषण जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात शहाणपण देगा देवा मोहीम

एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची संकल्पना

102
Pollution : प्रदूषण जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात शहाणपण देगा देवा मोहीम
  • प्रतिनिधी

वातावरणातील प्रदूषण (Pollution) कमी करणे आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जागरुकता निर्माण करण्यासाठी राज्यात शहाणपण देगा देवा मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने भाग घेऊन स्वच्छ वातावरण निर्मितीकडे वाटचाल करण्यास हातभार लावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले आहे. या मोहिमेची संकल्पना कदम यांनी मांडली आहे.

पर्यावरणाची हानी रोखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या पार्श्वभूमीवर नदी, नाले, तलावांत होणाऱ्या हानिकारक प्रदूषणाच्या (Pollution) परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करण्याची ही मोहीम आहे. त्या दृष्टीने पाऊले उचलली असून विविध माध्यमांसह डिजिटल बिलबोर्ड जाहिरातींमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावात इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे विर्सजन करण्यावर भर दिला होता.

(हेही वाचा – Naresh Mhaske यांची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका; म्हणाले…)

मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये सुमारे 76,000 इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे 191 कृत्रिम तलावांत विसर्जन केले होते. परंतु यंदा शहाणपण देगा देवा मोहिमेमुळे मुंबईतील नागरिकांवर होऊन यावर्षी 82,000 हून अधिक घरगुती व सार्वजनिक इको फ्रेंडली मूर्तींचे शहरभरातील 204 कृत्रिम तलावांत विसर्जन केले आहे. प्रदूषण (Pollution) महामंडाळाने जनतेत जागरूकता वाढवली. तसेच नागरिकांना स्मार्ट आणि पर्यावरणपूरक निर्णय घेण्यास प्रोत्साहित केल्याने हा बदल झाल्याचे दिसून आले, असे कदम यांनी सांगितले.

आगामी सणासुदीच्या हंगामात, महाराष्ट्र प्रदूषण (Pollution) नियंत्रण महामंडळाने अतिरिक्त शैक्षणिक मोहिमांसाठी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार पर्यावरण संवर्धनाच्या पद्धतींच्या महत्त्व याविषयी जागरुकता निर्माण केली जात आहे. प्रदूषण कमी करणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि हवेची गुणवत्ता सुधारणे हा यामागचा उद्देश आहे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.