BMC : महापालिकेत सहायक आयुक्तांच्या खांद्यावर अतिरिक्त कार्यभाराचा बोजा

923
BMC : महापालिकेत सहायक आयुक्तांच्या खांद्यावर अतिरिक्त कार्यभाराचा बोजा
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांकडील अतिरिक्त कार्यभाराची खांदेपालट करताना काही सहायक आयुक्तांवर नवीन खात्यांचा भार टाकला आहे. यामध्ये सहायक आयुक्त (मालमत्ता) या पदाचा भार विनायक विसपुते यांच्याकडून काढून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एफ उत्तर विभागाची जबाबदारी कायम ठेवत सहायक आयुक्त (मालमत्ता) विभागाच्या अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे, तर बाजार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हा के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे. (BMC)

(हेही वाचा – इंदापूरचे Harshvardhan Patil यांची स्थिती ‘न घर का, न घाट का’)

मुंबई महापालिकेत एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याकडे मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता, परंतु काही महिन्यांतच विसपुते यांच्याकडून या मालमत्ता विभागाचा भार काढून घेत एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांच्याकडे सोपवला आहे. एफ उत्तर विभागाचा भार कायम ठेवून मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले आहे. चौहाण यांच्याकडील बाजार विभागाचा अतिरिक्त कार्यभार के पूर्व विभागाचे मनिष वळंजू यांच्याकडे त्यांच्याकडील पदाचा भार कायम ठेवून देण्यात आला आहे. (BMC)

(हेही वाचा – Tirupati Laddu Prasad Adulteration प्रकरणाचा तपास तात्पुरता थांबवला)

जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्याकडील संपूर्ण मुंबईच्या अतिक्रमण निर्मुलनाचा भार कमी करून केवळ शहर भागाचा भार ठेवण्यात आला आहे आणि दोन उपनगरांच्या भार एच पश्चिम विभागाचे विनायक विसपुते यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे एकप्रकारे महापालिकेच्या सहायक आयुक्तांवरील अतिरिक्त कार्यभाराचा बोजा वाढत असून दुसरीकडे उपायुक्तपदी नियुक्त झालेल्या सहायक आयुक्तांवर त्यांच्रा पदाचा भार कायम ठेवून उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपण्यात आला आहे. त्यामुळे सहायक आयुक्तांच्या अनेक जागा रिक्त असल्याने उपायुक्तपदी बढती होऊनही सहायक आयुक्तपदाचा भार सांभाळावा लागत आहे. (BMC)

(हेही वाचा – Naresh Mhaske यांची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका; म्हणाले…)

अतिरिक्त कार्यभाराची खांदेपालट अशाप्रकारे
  • सहायक आयुक्त (एफ उत्तर) पृथ्वीराज चौहान, अतिरिक्त कार्यभार : मालमत्ता विभाग
  • सहायक आयुक्त (के पूर्व विभाग) मनिष वळंजु, अतिरिक्त कार्यभार : बजार विभाग
  • सहायक आयुक्त (एच पश्चिम) विनायक विसपुते, अतिरिक्त कार्यभार : अतिरिक्रमण निर्मुलन (दोन्ही उपनगरे)
  • सहायक आयुक्त (जी दक्षिण) मृदुला अंडे, अतिरिक्त आयुक्त : अतिक्रमण निर्मुलन (शहर भाग)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.