Mahim Fort : तोडक कारवाईच्या वर्षपूर्तीनंतरही माहिम किल्ल्यावर पुन्हा ‘हिरवा’ ध्वज

'राज्य संरक्षित स्मारक'चा फलक नाममात्र

93
Mahim Fort : तोडक कारवाईच्या वर्षपूर्तीनंतरही माहिम किल्ल्यावर पुन्हा 'हिरवा' ध्वज
Mahim Fort : तोडक कारवाईच्या वर्षपूर्तीनंतरही माहिम किल्ल्यावर पुन्हा 'हिरवा' ध्वज

मुंबईतील माहिम किल्ल्याच्या (Mahim Fort ) बुरुजावर पुन्हा एकदा हिरवा ध्वज फडकावण्यात आला आहे. मागील वर्षी दिवाळीमध्ये माहिम किल्ल्यावरील (Mahim Fort )अतिक्रमण हटवले होते. त्यानंतर किल्ल्यावर दीपोत्सव ही साजरा करण्यात आला होता. मात्र आता पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या आणि ‘ राज्य संरक्षित स्मारक’ (State Protected Monuments) म्हणून घोषित करण्यात आलेल्या माहिम किल्ल्यावर (Mahim Fort ) पुन्हा अतिक्रमण झालेले पाहायला मिळत आहे. अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुस्लिम होते.

( हेही वाचा : Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीची मुंबई २ जागांवर बोळवण!

किल्ला बनतोय गुर्दुल्यांचा अड्डा

दरम्यान माहिम किल्ल्यावरील (Mahim Fort ) ‘राज्य संरक्षित स्मारक’ (State Protected Monuments)असल्याचा फलक नाममात्र आहे, अशी टीका दुर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. मागील वर्षापर्यंत मुस्लिम कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात किल्ल्यावर (Mahim Fort )अनधिकृत बांधकाम (unauthorised construction) करून वस्ती केली होती. त्यानंतर दुर्गप्रेमींनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर राज्यशासनाने गडावरील २६७ कुटुंबांचे पुनर्वसन करून त्यांची अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली होती. पण आता पुन्हा किल्ल्यावरील बुरुजावर हिरवा ध्वज फडकताना दिसत आहे. याठिकाणी मद्यपी, अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नष्ट होऊ लागला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.