गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान; Sanjay Raut अग्रलेखातून बरळले

68
गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान; Sanjay Raut अग्रलेखातून बरळले
गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान; Sanjay Raut अग्रलेखातून बरळले

गायींना ‘राज्यमाता’ दर्जा देण्याचा निर्णय महायुती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. पण, हा निर्णय विरोधकांच्या पचनी पडला नाही. आजच्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात याविषयावर संजय राऊत (Sanjay Raut) बरळले आहेत. गायी मंचावर, सरकार गोठ्यात!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख (Saamana Editorial) प्रसिद्ध झाला आहे. गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान असल्याचं राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

(हेही वाचा-Online Fraud : सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीशही ‘बनावट’; बड्या उद्योगपतीला सात कोटींचा गंडा)

अग्रलेखात म्हटले आहे की, गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे.अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते. (Sanjay Raut)

(हेही वाचा-Mahim Fort : तोडक कारवाईच्या वर्षपूर्तीनंतरही माहिम किल्ल्यावर पुन्हा ‘हिरवा’ ध्वज)

भाजप व मिंधे यांना शेंडी-जानव्याचे हिंदुत्व पुन्हा आणायचे आहे व तरुणांना नोकऱ्या, शिक्षण, आधुनिक विचार देण्याऐवजी गोठ्यात शेण काढायला राबवायचे आहे. पुन्हा गोमातेच्या बाबतीत मोदी सरकारचा मुखवटा आधीच साफ गळून पडला आहे. कारण मोदी काळातच गोमांसाची निर्यात वाढली. भारताची गोमांस म्हणजे बीफ निर्यात 216 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी झाली. म्हणजे मोदी काळात गोमातेच्या किंवा राज्यमातेच्या कत्तली जोरात सुरू असून त्या कत्तलींवर मोदी सरकारची अर्थव्यवस्था टिकून आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मिंधे सरकार काय उचापती करेल याचा नेम नाही. देवांना, गायींनाही राजकारणात आणून निवडणुकांना सामोरे जाण्याचा हा प्रकार हास्यास्पद आहे. असे सामना अग्रलेखात म्हटले आहे. (Sanjay Raut)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.