Mumbai Crime : मुंबईतील रुग्णालयात बदलापूरची पुनरावृत्ती टळली; ५ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

205
Crime : पाच वर्षांपासून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला अटक
Crime : पाच वर्षांपासून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला अटक
मुंबईतील एका रुग्णालयात बदलापूरची पुनरावृत्ती टळली आहे, रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा २६ वर्षीय नातेवाईकाने ५ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीने आरडाओरड केल्यामुळे हा प्रकार पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या तात्काळ लक्षात आल्यामुळे मुलींवरील प्रसंग टळला. पोलिसांनी याप्रकरणी या तरुणाविरुद्ध भारतीय न्याय सहींता कलम ७५ आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्णाच्या महिला नातेवाईकाच्या सुरक्षेचा प्रश्न  निर्माण झाला आहे. (Mumbai Crime)
इरफान खान (irrfan khan) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी पाच वर्षाची असून तीचे कुटूंब मूळचे उत्तर प्रदेश येथे राहणारे आहेत. पीडित मुलीची आईवर मागील एक वर्षांपासून मुंबईतील सरकारी संस्थेच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच आरोपी हा मुंबईत राहणारा असून त्याची महिला नातेवाईक या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहे.३० सप्टेंबर रोजी पीडित मुलगी तिची आजी आणि भावंड रुग्णालयातील परिसरात बसलेले असताना रात्री उशिरा इरफान हा पीडित मुलीजवळ आला व तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने जिन्याजवळ घेऊन गेला, त्या ठिकाणी त्याने मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रसंग करीत असताना मुलीने जोरजोरात रडण्यास सुरुवात केली, तीच्या रडण्याचा आवाजाने तिची आजी आणि भावंड तिच्याजवळ धावत आले, आणि त्यांनी आरोपी इरफान च्या तावडीतून  मुलीची सुटका केली. (Mumbai Crime)
दरम्यान गोंधळ ऐकून रुग्णालयातील इतर रुग्णाचे नातेवाईक धावत आले व त्यांनी इरफानला पकडून ठेवले, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी मुलीकडे चौकशी केली असता तीने इरफान ने तिला अयोग्यरित्या स्पर्श करीत होता. याघटनेची माहिती भोईवाडा पोलिसांना देण्याचे आली असता, पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी आरोपीने हात झटकून तेथून पळ काढला. पोलिसांनी या घटनेची नोंद गंभीरतेने घेऊन आरोपी इरफान विरुद्ध भारतीय न्याय सहींता कलम ७५ आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पळून गेलेल्या इरफानचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याला त्याची रुग्णालयात दाखल असलेली मामीची प्रकृती बिघडली असल्याचे खोटे सांगून त्याला रुग्णालयात बोलावून घेत त्याला अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.