-
ऋजुता लुकतुके
इराणी चषकाच्या अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध शेष भारत अशी लढत सध्या लखनौच्या एकाना स्टेडिअमवर सुरू आहे. पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नाबाद ८६ धावांच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवशी वर्चस्व मिळवलंय. अजिंक्य फलंदाजीला आला तेव्हा मुंबईची अवस्था ३ बाद ३७ अशी होती. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) (४), आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) (१९) आणि हार्दिक तामोरे (Hardik Tamore) शून्यावर बाद झाले होते. पण, त्यानंतर अजिंक्यने वेळेची गरज ओळखत फलंदाजी केली. दिवसअकेर तो ८६ धावांवर नाबाद राहिला. त्यासाठी त्याने ५ तास आणि १९७ चेंडू घेतले. त्याच्याबरोबर सुरूवातीला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) होता. त्याने ५४ धावा करून अजिंक्यबरोबर १०२ धावांची भागिदारी केली. यश दयालने ही जोडी फोडल्यावर अजिंक्य आणि सर्फराझ (sarfaraz khan) ही जोडी जमली. दोघांनी दिवसअखेर ९८ धावांची नाबाद भागिदारी केली आहे. सर्फराझ ५४ धावांवर नाबाद आहे. (Irani Cup 2024)
(हेही वाचा- Mumbai Crime : मुंबईतील रुग्णालयात बदलापूरची पुनरावृत्ती टळली; ५ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न)
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मुंबईचा सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे. कर्णधार म्हणून त्याचं कौशल्य वादातीत असलं तरी फलंदाज म्हणून मागच्या हंगामात तो फारसा चालला नव्हता. शिवाय मानदुखीमुळेही तो बेजार होता. कर्णधार म्हणून त्याने मुंबईला गेल्या हंगामात ४२ व्यांदा रणजी करंडक जिंकून दिला. पण, त्याची स्वत:ची बॅट तळपली नव्हती. आता मुंबईने गेल्या २४ वर्षांत एकदाही इराणी चषक जिंकलेला नाही. यावेळी अजिंक्य रहाणे आणि त्याच्या संघाकडून तशी अपेक्षा आहे. मागच्या अख्ख्या हंगामात मिळून अजिंक्य रहाणेनं १७ च्या सरासरीने २१४ धावा केल्या होत्या. यात त्याची फक्त दोन अर्धशतकं आहेत. (Irani Cup 2024)
Stumps on Day 1!
A fantastic recovery for Mumbai, courtesy of captain Ajinkya Rahane (86*), Shreyas Iyer (57) and Sarfaraz Khan (54*).
From 37/3 they have moved to 237/4.
Mukesh Kumar picked up 3 wickets.#IraniCup | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/Er0EHGOrUJ pic.twitter.com/wjszlLBjEW— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 1, 2024
जानेवारी २०२३ मध्ये त्याने रणजी स्पर्धेतील शेवटचं शतक ठोकलं आहे. आसाम विरुद्ध त्याने १९१ धावा केल्या होत्या. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी इंग्लिश काऊंटी स्पर्धेत त्याने लँकेशायर संघाकडून शतक झळकावलं आहे. (Irani Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community