केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी व पूरामुळे बाधित देशातील 14 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 5 हजार 858 कोटी 60 लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केल्याबद्दल तसेच त्यापैकी सर्वाधिक 1 हजार 492 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे आभार मानले आहेत.
(हेही वाचा – Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन!)
नुकत्याच वितरीत झालेल्या निधीसह केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून (Central Disaster Relief Fund) संबंधित 21 राज्यांना यावर्षी आतापर्यंत एकूण 14 हजार 958 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही बाब आपत्ती निवारणाच्या कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचे दाखविणारी आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी, आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655 कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी 80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा अग्रिम निधी वितरीत करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community