देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त (Lal Bahadur Shastri Jayanti) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आदरांजली अर्पण केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मिडीयावर फोटोसह श्रद्धांजली संदेश जारी केला आहे. विजय घाट या शास्त्रींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून लाल बहादूर शास्त्रींना (Lal Bahadur Shastri Jayanti) अभिवादन केले.
देश के जवान, किसान और स्वाभिमान के लिए अपना जीवन समर्पित करने वाले पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि।
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2024
पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त (Lal Bahadur Shastri Jayanti) विनम्र अभिवादन. त्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे.
पूर्व प्रधानमंत्री श्री लाल बहादुर शास्त्री जी की जयंती पर, मैं उनको विनम्र श्रद्धांजलि अर्पित करती हूं। शास्त्री जी ने आजीवन सादगी, ईमानदारी और देशभक्ति के उच्चतम आदर्श प्रस्तुत किए। उनके सुदृढ़ नेतृत्व में भारत ने आर्थिक, सामरिक एवं अन्य सफलताएं प्राप्त की। आइए, उनके जीवन से…
— President of India (@rashtrapatibhvn) October 2, 2024
राष्ट्रपती मुर्मू यांनीही लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri Jayanti) यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मुर्मू यांनी सोशल मिडिया पोस्ट करत म्हटले की, “माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करते. शास्त्रीजींनी आयुष्यभर साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीचा सर्वोच्च आदर्श मांडला. त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली भारताने आर्थिक, सामरिक आणि इतर यश संपादन केले. आपण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊ आणि सशक्त भारत घडवण्याचा संकल्प करूया.”
हेही पहा-
Join Our WhatsApp Community