IPL 2025 : परदेशी खेळाडूंना आयपीएल प्रशासनाचा दणका, हंगामात खेळला नाहीत…

60
IPL 2025 : परदेशी खेळाडूंना आयपीएल प्रशासनाचा दणका, हंगामात खेळला नाहीत…
IPL 2025 : परदेशी खेळाडूंना आयपीएल प्रशासनाचा दणका, हंगामात खेळला नाहीत…
  • ऋजुता लुकतुके 

आयपीएलच्या मेगा लिलावासाठी उपलब्ध असतील आणि पुढील हंगामात मात्र खेळले नाहीत, तर अशा खेळाडूंवर पुढील हंगामापासून कारवाई करण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेत याविषयी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये असे काही प्रसंग झालेले आहेत. खासकरून परदेशी खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहत नाहीत. आणि त्यांच्यासाठी भरपूर पैसे मोजणाऱ्या संघ मालकांना त्याचा भूर्दंड पडतो. आता बीसीसीआयने या विषयीचा नवीन नियम जाहीर केला आहे. खेळाडू लिलावात सहभागी झाले. पण, आयपीएल खेळले नाहीत, तर अशा खेळाडूंना पुढील दोन हंगामातही खेळता येणार नाही. (IPL 2025)

(हेही वाचा- Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणे, सर्फराझ, श्रेयसच्या शतकांमुळे पहिल्या दिवसावर मुंबईचं वर्चस्व)

‘जे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होतील. हंगामात खेळणार नाहीत, अशा खेळाडूंना पुढील दोन हंगाम लिलाव व स्पर्धेत सहभागी होता येणार नाही,’ असं बीसीसीआयचा (BCCI) नवीन नियम सांगतो. मागच्या हंगामात आणखी एक समस्या उद्भवली होती. काही खेळाडूंनी हंगामा आधीच्या छोटेखानी लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं. पण, ते आधीच्या मेगा लिलावात उपलब्ध नव्हते. या दोन लिलावांतील रकमांची गणितं वेगळी असतात. (IPL 2025)

जसं गेल्याच हंगामात मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) हे दोघे ऑस्ट्रेलियन मेगा लिलावात नव्हते. पण, छोटेखानी लिलावात त्यांनी अनुक्रमे २४.७५ कोटी आणि २०.५० कोटी रुपयांची किंमत घेतली. याचाही फटका संघ मालकांना बसत आहे. त्यामुळे यापुढे मेगा लिलावात नाव नोंदवलेले खेळाडूच छोटेखानी लिलावातही सहभागी होऊ शकतील. फक्त छोट्या लिलावात थेट प्रवेश आता मिळणार नाही. (IPL 2025)

(हेही वाचा- Israel मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी विशेष ॲडव्हायजरी जाहीर!)

खेळाडू तंदुरुस्त नसतील तर नेमकं काय करायचं यावर सध्या बीसीसीआयचं धोरण स्पष्ट नाही. त्यांनी खेळाडूच्या राष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून तंदुरुस्ती विषयीचं प्रमाणपत्र आणावं असं सध्या बीसीसीआयने म्हटलं आहे. पण, येत्या दिवसांत बंगळुरुच्या क्रिकेट केंद्रात अशी एक यंत्रणा उभारून तिथेच खेळाडूंच्या तंदुरुस्तीची तपासणी होईल यासाठी बीसीसीआय विचार करत आहे. सध्या मात्र खेळाडूच्या राष्ट्रीय क्रिकेट मंडळाचं प्रमाणपत्र गृहित धरण्यात येईल. (IPL 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.