Maharashtra medical College: राज्यात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी; आता वर्षाला ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

47
Maharashtra medical College: राज्यात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी; आता वर्षाला ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
Maharashtra medical College: राज्यात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी; आता वर्षाला ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना (Maharashtra medical College) परवानगी मिळाली आहे. मुंबई, नाशिक, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि हिंगोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. या आठ महाविद्यालयात एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएस करीता प्रवेश मिळणार आहे.

(हेही वाचा-Lal Bahadur Shastri Jayanti: पंतप्रधान मोदींकडून माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना अभिवादन!)

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय (Maharashtra medical College) स्थापन करण्याचे शासनाचे धोरण आहे. आता राज्यात एकूण ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. आता वर्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी विविध देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने आता विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ शकतात.

(हेही वाचा-Israel मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी विशेष ॲडव्हायजरी जाहीर!)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्यमंत्री यांच्याही सहकार्यामुळे राज्यात कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली. (Maharashtra medical College)

(हेही वाचा-गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान; Sanjay Raut अग्रलेखातून बरळले)

या १० महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता व इतर आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत १० महाविद्यालयाची बांधकाम निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बांधकामे सुरू करण्यात येणार आहे. (Maharashtra medical College)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.