महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (‘एमएमएमओसीएल’) (MMMOCL) नवरात्रोत्सव (Navaratri 2024) काळात ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान रात्री उशिरापर्यंत १२ अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दहिसर पश्चिम • अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व ते गुंदवली मेट्रो ७’ मार्गावर या १२ अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
सणासुदीच्या (Navaratri 2024) काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘एमएमएमओसीएल’ ने मेट्रो (Metro) मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या चालण्यात येतात. गणेशोत्सवात या दोन्ही मेट्रो मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात आल्या होत्या. आता नवरात्रोत्सवात (Navaratri 2024) पाच दिवस अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय ‘एमएमएमओसीएल’ ने घेतला आहे. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या दोन्ही मार्गिकांवर ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान १२ अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएमएमओसीएल’कडून देण्यात आली. (Navaratri 2024)
अंधेरी पश्चिम स्थानकावरून सुटणाऱ्या सहा अतिरिक्त फेऱ्या (Navaratri 2024)
रात्री ११.१५ वाजता सुटेल आणि रात्री १२.२४ वाजता गुंदवलीला पोहचेल
रात्री ११.३० वाजता सुटेल आणि रात्री १२.३९ वाजता गुंदवलीला पोहचेल
रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि रात्री १२.५४ वाजता गुंदवलीला पोहचेल
रात्री रात्री १२ वाजता सुटेल आणि रात्री १.०९ वाजता गुंदवलीला पोहचेल
रात्री १२.१५ वाजता सुटेल आणि रात्री १.२४ वाजता गुंदवलीला पोहचेल
रात्री १२.३० वाजता सुटेल आणि १.३९ मिनिटांनी गुंदवलीला पोहचेल
गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गिकेवरील सहा अतिरिक्त फेऱ्या (Navaratri 2024)
गुंदवलीहून रात्री १२.१५ वाजता सुटेल आणि रात्री १२.२४ वाजता अंधेरीला पोहचेल
गुंदवलीहून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि रात्री ११.३९ वाजला अंधेरीला पोहचेल
गुंदवलीहून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि रात्री १.५४वाजता अंधेरीला पोहचेल
गुंदवलीहून रात्री १२.०० वाजता सुटेल आणि रात्री १.०९ वाजता अंधेरीला पोहचेल
गुंदवलीहून रात्री १२.१५ वाजता सुटेल आणि रात्री १.२४ वाजता अंधेरीला पोहचेल
गुंदवलीहून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि रात्री १.३९ वाजता अंधेरीला पोहचेल
हेही पहा-
Join Our WhatsApp Community