M. S. Dhoni : धोनीला खरंच ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून चेन्नई कायम राखणार का?

55
M. S. Dhoni : धोनीला खरंच ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून चेन्नई कायम राखणार का?
M. S. Dhoni : धोनीला खरंच ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून चेन्नई कायम राखणार का?
  • ऋजुता लुकतुके 

आयपीएलने मेगा लिलावापूर्वी सध्याचे ६ खेळाडू कायम राखण्याची मुभा संघ मालकांना दिली आहे. त्याचा वापर करून संघांना लिलावापूर्वी आपली रणनीती ठरवायची आहे. नवीन नियमानुसार, ५ वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला खेळाडू हा अननुभवी म्हणजेच अनकॅप्ड खेळाडू धरला जाईल. त्याला कायम ठेवण्यासाठी संधाला लिलावाच्या उपलब्ध रकमेपैकी फक्त ४ कोटी रुपयेच सोडावे लागतील. अननुभवी खेळाडूंसाठीचा हा नियम फक्त भारतीय खेळाडूंनाच लागू आहे. (M. S. Dhoni)

(हेही वाचा- ५.७९ कोटी रुपये कर चोरी करणाऱ्याला अटक; महाराष्ट्र GST विभागाची धडक कारवाई)

नियम ठरवण्यापूर्वीच या नियमाची चर्चा सुरू होती. चेन्नई सुपरकिंग्ज फ्रँचाईजीने (Chennai Super Kings Franchise) महेंद्र सिंग धोनीला आपल्याकडे राखण्यासाठीच या नियमाचा आग्रह धरल्याचं बोललं जात होतं. आता हा नियम झाल्यावर संघ मालकांची धोनीविषयी नेमकी भूमिका काय असणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे. कारण, स्वत:ला अननुभवी म्हणवून घ्यायला धोणीसारखा दिग्गज खेळाडू तयार होईल का, हा ही प्रश्न आहे. (M. S. Dhoni)

त्यामुळेच चेन्नई संघ मालकांनीही हा विषय संवेदनशीलतेनं हाताळायचं ठरवलं आहे. धोनी आपल्या अमेरिका दौऱ्यावरून अलीकडेच भारतात परत आला आहे. चेन्नई संघ मालक या विषयावर आता त्याच्याशी संवाद साधणार आहेत. धोनी लीगच्या सुरुवातीपासून चेन्नई फ्रँचाईजीबरोबर आहे. फक्त मधली दोन वर्षा जेव्हा चेन्नई संघ आयपीएल खेळू शकणार नव्हता, तेव्हा धोनी पुणे वॉरिअर्स संघाकडून खेळला. शिवाय संघाच्या ब्रँड मूल्याच्या दृष्टीनेही धोनी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशावेळी त्याला अननुभवी खेळाडू ठरवणार की, इतर कायम ठेवलेल्या खेळाडूंचा मान त्याला देणार, हे चेन्नईनेही अजून ठरवलेलं नाही. (M. S. Dhoni)

(हेही वाचा- Maharashtra medical College: राज्यात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी; आता वर्षाला ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश)

‘धोनी इतके दिवस अमेरिकेत होता. त्याच्याशी आम्ही याविषयी काही बोललेलोच नाही. आता चेन्नईत सगळे जमू तेव्हा नक्कीच यावर बोलणं होईल. पण, धोनीसारख्या खेळाडूसाठी आम्ही अननुभवी खेळाडूची जागा कदाचित वापरणारही नाही,’ असं संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलचं विक्रमी पाचवेळा विजेतेपद पटकावलं आहे. (M. S. Dhoni)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.