Rohit on Gambhir : गंभीर आल्यावर ड्रेसिंग रुममध्ये काय बदललं, सांगतोय रोहित शर्मा

Rohit on Gambhir : रोहित आधी खेळाडू म्हणूनही गौतम गंभीरसोबत खेळलेला आहे 

160
Rohit on Gambhir : गंभीर आल्यावर ड्रेसिंग रुममध्ये काय बदललं, सांगतोय रोहित शर्मा 
Rohit on Gambhir : गंभीर आल्यावर ड्रेसिंग रुममध्ये काय बदललं, सांगतोय रोहित शर्मा 
  • ऋजुता लुकतुके 

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघाने पहिला मालिका विजय मिळवला आहे. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही मोकळ्या मनाने गौतम गंभीरचं कौतुक केलं आहे. यापूर्वी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आपल्या शेवटच्या मोहिमेत टी-२० विश्वचषकातील विजय भारताला मिळवून दिला. १३ वर्षांनंतर भारतीय संघाला आयसीसी करंडक जिंकता आला. त्याचबरोबर राहुल द्रविडने भारतीय संघाला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तीनही प्रकारात अव्वल क्रमांक पटकावून दिला. (Rohit on Gambhir)

त्यानंतर जून महिन्यात भारतीय संधाचे प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची निवड झाली आहे. गंभीरची सुरुवात काहीशी अडखळती होती. कारण, पहिल्याच मालिकेत श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा पराभव झाला. तर झिंबाब्वेसारख्या दुबळ्या संघाने टी-२० मध्ये भारताला हरवलं. पण, आता हळू हळू गंभीर यांचाही प्रशिक्षक म्हणून जम बसला आहे. (Rohit on Gambhir)

(हेही वाचा- Ayushman Bharat योजनेअंतर्गत ५०० कोटींचे देयक पंजाब सरकारकडे थकीत! रुग्णालयांची न्यायालयात धाव)

‘आपण सगळे प्रवाही असतो. बदल होत जातात. राहुलभाईंनी जेव्हा सांगितलं की, प्रशिक्षक म्हणून त्यांना थांबायचं आहे. तेव्हाच कुणीतरी नवीन येणार हे ठरलेलं होतं. बदल कधीतरी होणारच होता. राहुलभाईबरोबरचा काळ खूप मजेत गेला. आता गौतम गंभीर संघाबरोबर आहेत. मी त्याच्याबरोबर खेळाडू म्हणूनही खेळलो आहे. सुरुवात तर झकास झालीय,’ असं रोहित गंभीरविषयी बोलताना म्हणाला. (Rohit on Gambhir)

 गौतम गंभीरच्या येण्याने संघात आक्रमकता आल्याचं रोहित शर्माला वाटतं. ‘गौतम गंभीरचं नाव चर्चेत होतं तेव्हापासून हे सगळ्यांना माहीत होतं. गंभीरबरोबर आक्रमकता ड्रेसिंग रुममध्ये येणार. काही आक्रमक निर्णय घेतले जाणार. त्यासाठी खेळाडू म्हणूनही आम्ही तयार होतोच. संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये ज्या प्रकारची चुरस बघायला मिळतेय, त्याबद्दल तोड नाही,’ असं रोहितने गंभीरच्या शैलीबद्दल बोलून दाखवलं. (Rohit on Gambhir)

(हेही वाचा- Mahavitaran Bill : अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीजेचे दर चढे; ग्राहक नाराज)

तर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) राहुल आणि गंभीरच्या शैलीत काही फारसा फरत नसल्याचं सांगितलं. ‘मला व्यक्तीश: दोघांमध्ये काही फरत दिसत नाही. दोघंही संघाला जिंकण्यासाठी प्रेरित करतात. देशासाठी दोघांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. आताही भारतीय क्रिकेटसाठी ते वेळ देत आहेत. क्रिकेटकडे पाहण्याचा दोघांचाही दृष्टिकोण सारखा आहे,’ असं अश्विन म्हणाला. (Rohit on Gambhir)

आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघाचा आणि प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा खरा कस लागणार आहे.  (Rohit on Gambhir)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.