राजकीय नेत्यांच्या सभा भरल्या की नेत्यांमागे पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अनेकदा टीका होते. कारण हे कार्यकर्ते अनेक नेत्यांची हुजरेगिरी करताना दिसतात. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) दि. २ ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमासाठी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये आले होते. त्यावेळी पायातील बुट सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना काढता येत नव्हते. तेव्हा एक कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने स्वत:च्या हाताने सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या बुटाची लेस सोडून बुट काढले. पण यावेळी त्या कार्यकर्त्यांच्या हातात भारताचा राष्ट्रध्वज (national flag ) होता. ज्यामुळे काँग्रेसवर (Congress ) आणि सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यावर टीका होत आहे.
नेमक प्रकरण काय?
दि. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त सिद्धरामय्या(Siddaramaiah) हे बंगळुरु येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात महात्मा गांधींना मानवंदना देण्यासाठी येणारे सिद्धरामय्या (Siddaramaiah) पायातील बुट काढत होते. मात्र पायातील बुट निघत नसल्याने ‘सतरंजी उचले’ अशी टीका होत असलेला एक कार्यकर्ता पुढे आला. त्याने स्वत:च्या हाताने सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या पायातील बुट काढले. परंतु त्यावेळी त्याच्या हातात भारताचा राष्ट्रध्वज (national flag ) होता, जो कोणीतरी ओढून घेतल्याचे ही पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र राष्ट्रध्वज हातात असताना केलेल्या या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. (Congress)
Join Our WhatsApp Community