Haryana Assembly Election : मुलांसाठी हरियाणातील नेते प्रचाराच्या मैदानात

107
Haryana Assembly Election : हरियाणात मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला
  • प्रतिनिधी

स्वतःच्या मुलांना आमदार बनविण्यासाठी हरियाणातील दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानात अहोरात्र घाम गाळताना दिसत आहेत. हरियाणातील अर्धा डझनहून अधिक नेत्यांनी आपला राजकीय वारसा पुढं चालविण्यासाठी मुला-मुलींच्या निवडणूक प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली आहेत. पुढची पिढी फक्त नावासाठी निवडणूक लढत आहेत. प्रचाराची खरी धुरा तर त्यांच्या पालकांच्या हातात आहे.

कार्यक्रमाची आखणी करण्यापासून ते प्रसिद्धी आणि हल्ल्याची रणनीती बनवण्यापर्यंतचे काम मोठे दिग्गजच करत आहेत. हरियाणातील ही राजकीय घराणी आपल्या पुढच्या पिढीकडे राजकीय वारसा सोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. येत्या ५ ऑक्टोबरला राज्यातील जनता कोणत्या नव्या चेहऱ्यांची आपला प्रतिनिधी म्हणून निवड करते आणि कुणाला नाकारते याचा निर्णय ५ ऑक्टोबरला होईल. निकाल ८ ऑक्टोबरला येणार आहे. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – पुणे काँग्रेसने जिल्ह्यातील ‘या’ जागांवर दावा केल्यामुळे Mahavikas Aghadi मध्ये बिघाडी ?)

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला पुन्हा उचाना कलान मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पक्षाच्या अन्य उमेदवारच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. यामुळे दुष्यन्त चौटाला यांच्या मतदारसंघतील प्रचाराची सर्वस्वी धुरा आई नयना चौटाला यांनी आपल्या हाती घेतली आहे. त्या एकामागून एक गाव पिंजून काढत आहे. विशेषतः महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. दुष्यंतच्या निवडणुकीचे संपूर्ण व्यवस्थापन आई नयनाच्या हातात आहे. तर त्यांचे वडील डॉ. अजयसिंह चौटाला हेही वेळोवेळी उचानाला भेट देत असतात.

माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांचा राजकीय वारसा आपल्या मुलाकडे सोपवण्याची योजना आखली आहे. यावेळी त्यांचे चिरंजीव ब्रिजेंद्र सिंह उचाना येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. चौधरी बिरेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी प्रेमलता दोघेही ब्रिजेंद्र सिंह यांच्यासाठी घाम गाळत आहेत. नाराज मतदारांची समजूत काढण्यासाठी बिरेंद्र सिंह प्रत्येक गावात प्रचारसभा घेत आहेत. आई प्रेमलता महिलांमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – Navaratri 2024: नवरात्रोत्सवात मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार; वाचा संपूर्ण वेळापत्रक)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांचे चिरंजीव आदित्य सुरजेवाला कैथलमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यांनी आपल्या मुलाला विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आदित्य सुरजेवाला उमेदवार असले तरी संपूर्ण निवडणूक रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांभाळली आहे. शहरापासून गावापर्यंत आणि गल्लीपासून गल्लीपर्यंत सुरजेवाला आपल्या मुलाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. संतप्त जनतेला शांत करण्यापासून ते आपल्या मुलाच्या प्रमोशनची रणनीती आणि कार्यक्रमही ठरवत आहेत. सुरजेवाला हे निवडणुकीमध्ये इतके व्यस्त आहेत की ते फक्त तीन तास झोप घेत आहेत.

काँग्रेसचे खासदार जेपी यांचे पुत्र विकास सहारन हे कलायतमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. मतदारसंघात नवा चेहरा असल्याने संपूर्ण निवडणूक त्यांचे वडील जेपी सांभाळत आहेत. ते यापूर्वी येथून आमदार होते. जेपी येथे त्यांच्या मुलाचे स्टार प्रचारक आहेत. ते संपूर्ण निवडणूक हाताळत आहेत आणि तेच विरोधी नेत्यांवरही हल्लाबोल करत आहेत. जेपी आपल्या मुलाच्या निवडणुकीमध्ये इतके व्यस्त आहेत की ते फक्त पाच तास झोपतात. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – Lal Bahadur Shastri Jayanti: पंतप्रधान मोदींकडून माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना अभिवादन!)

हरियाणाच्या राजकारणाचे जुने खेळाडू अजय यादव यांनी मुलगा चिरंजीव यादव यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. ते काँग्रेस पक्षातर्फे रेवाडीतून निवडणूक लढवत आहेत. वडील कॅप्टन अजय यादव हे राजकारणातील जुने खेळाडू असल्याने शहरापासून खेड्यापर्यंत प्रचाराला धार देत आहेत. कॅप्टनला मतदारसंघाची नाडी कळते आणि ते जुने कार्यकर्ते आणि संघ जोडत आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री राव इंदर सिंग हे मुलगी आरती राव यांच्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. आरती भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. राव इंद्रजीत यांनी आपल्या मुलीच्या विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. चौधरी बन्सीलाल यांचा वारसा ताब्यात घेण्यासाठी तोशाममध्ये लढाई सुरू आहे. येथे भाजप खासदार किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी रिंगणात आहेत, तर रणबीर महेंद्र यांचा मुलगा अनिरुद्ध चौधरी काँग्रेसकडून उमेदवार आहे. श्रुती चौधरीसाठी किरण चौधरी प्रचारात व्यस्त आहेत. तर त्अनिरुद्ध चौधरीसाठी वडील रणबीर महेंद्र यांनी जीवाचे रान केले आहे. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; धुक्यामुळे घडली दुर्घटना)

मात्र, काही नेते असेही आहेत जे आपल्या मुलाचा प्रचार करू शकत नाही आहे. यात माजी मंत्री निर्मल सिंग यांचे नाव घेता येईल. अंबाला शहरातील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री निर्मल सिंह हे पहिले नेते आहेत जे आपल्या मुलीचा प्रचार करू शकत नाही आहेत. चित्रा सरवरा यांना अंबाला कँटमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने चित्रा यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली. दोघेही निवडणूक लढवत आहेत, पण निर्मल सिंग आपल्या मुलीचा प्रचार करू शकत नाहीत, इथे चित्रा स्वतः पुढाकार घेत आहेत. (Haryana Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.