Conversion Case : ‘ख्रिश्चन हो, सारे दु:ख दूर होतील’; पैशाचे आमिष दाखवून हिंदू महिलेच्या धर्मांतराचा डाव

बायबल वाचण्यास पीडितेला केली जबरदस्ती

126
Conversion Case : 'ख्रिश्चन हो, सारे दु:ख दूर होतील'; पैशाचे आमिष दाखवून हिंदू महिलेच्या धर्मांतराचा डाव
Conversion Case : 'ख्रिश्चन हो, सारे दु:ख दूर होतील'; पैशाचे आमिष दाखवून हिंदू महिलेच्या धर्मांतराचा डाव

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद (Ghaziabad) येथे एका हिंदू (Hindu) महिलेवर धर्मांतरणासाठी (Conversion Case) दबाव टाकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. महिलेला ख्रिश्चन होण्यास पैशाचे आमिष दाखवले गेले. पीडित महिलेने सांगितले की, ख्रिश्चन झाल्यास तुझी सर्व दु:ख नाहीशी होतील, असे धर्मांतर करणाऱ्यासाठी दबाव टाकणाऱ्यांनी सांगितले. तसेच पीडितेला पैशाचे आमिष दाखवून बायबल (Bible) वाचण्यास मजबूर करण्यात आले. हे प्रकरण गाजियाबाद जिल्ह्याच्या क्राँसिंग रिपब्लिक ठाण्याच्या हद्दीतील आहे.

( हेही वाचा : Haryana Assembly Election : मुलांसाठी हरियाणातील नेते प्रचाराच्या मैदानात

पीडित महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी पुष्पासह काही जणांच्याविरोधात केस दाखल केली आहे. त्यानंतर आरोपीच्या अटकेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांकडून छापे टाकण्यात आले आहेत. पीडितेने सांगितले की, तिच्या घराशेजारी पुष्पा नावाची महिला राहते. पुष्पा अनेक दिवसांपासून मला ख्रिश्चन धर्मात धर्मांतर (Conversion Case ) करण्यासाठी दबाव टाकत होती. यासर्वात पुष्पाचे अन्य साथीदारही सहभागी असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. तसेच पुष्पाने २- ३ महिने प्रार्थना सभेत येण्यास सांगून त्याबदल्यात पैसे दिले जातील अशी ऑफर पीडितेला दिली.

सोनूच्या घरी भरली प्रार्थना सभा

दरम्यान पुष्पा पीडितेला सोनू नावाच्या व्यक्तीच्या घरी घेऊन गेली. तिथे येशू ख्रिस्तांची प्रार्थना सुरु होती. यावेळी पीडितेला जबरदस्ती बायबल (Bible) वाचण्यास सांगितले. मात्र यावेळी पीडितेचा पती आपल्या काही सहकाऱ्यांसह प्रार्थना सभेत पोहचला. त्याने यासर्व गोष्टींचा विरोध करत पीडित पत्नीला तिथून घरी नेले. ज्यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पुष्पासह इतर साथीदारांवर कठोर कारवाईची मागणी पीडितेने केली. दरम्यान आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.