- ऋजुता लुकतुके
१ ऑक्टोबरला सुरू झालेल्या नवीन महिन्यात दोन महत्त्वाच्या गुंतवणूक साधनांचे नियम बदलले आहेत. दोन्ही योजना सरकारी असून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात सुरक्षित योजना मानल्या जातात. पब्लिक प्रॉव्हिडंड फंड म्हणजेच पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी (Sukanya Samriddhi Yojana) अशा दोन योजनांचे नियम बदलले आहेत. वयाची १८ वर्षं पूर्ण झालेला नागरिक पीपीएफ खातं उघडू शकतो. अलीकडे सरकारने अल्पवयीन मुलांच्या नावे पीपीएफ खातं उघडण्यालाही परवानगी दिली आहे. पण, मुलं १८ वर्षांची होईपर्यंत आता हे खातं पोस्टातील मुदतठेव खातं म्हणूनच वापरण्यात येईल. आणि मूल १८ वर्षांचं झाल्यावरच ते खातं पीपीएफमध्ये परावर्तित होईल.
दुसरीकडे १० मुलीचं भविष्य सुनिश्चित करण्यासाठी केंद्राने २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. १८ वर्षांच्या या योजनेत दहा वर्षांखालील मुलीच्या नावे खातं सुरू करता येतं. मुलीचं शिक्षण तसंच विवाह प्रसंगी एक मोठी रक्कम मुलांना मिळू शकते. या दोन्ही योजनांवर देशातील सर्वात जास्त व्याजदर सध्या लागू होत आहे. तसंच या योजनांमधील दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करबचतही शक्य होते.
(हेही वाचा – Haryana Assembly Election : मुलांसाठी हरियाणातील नेते प्रचाराच्या मैदानात)
अशा या योजनांमध्ये केंद्र सरकारने काही सूक्ष्म बदल केले आहेत.
पीपीएफ योजनेतील पहिला बदल –
अल्पवयीन पाल्यासाठी खोलण्यात आलेल्या पीपीएफ अकाऊंटसंदर्भात पहिला नियम बदलण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार आता अल्पवयीन मुलांसाठी खोलण्यात आलेल्या पीपीएफ अकाऊंटवर संबंधित मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटच्या हिशोबाने व्याज मिळेल. त्यानंतर मुलगा १८ वर्षांचा झाल्यानंतर पीपीएफ योजनेनुसार व्याजदर लागू होईल. तसेच म्यॅच्यूरीचा कालावधी १८ व्या वर्षांपासून मोजला जाईल. (Sukanya Samriddhi Yojana)
(हेही वाचा – Ujani Dam: उजनीच्या पाण्यावर ६ कोटींची वीजनिर्मिती!)
दुसरा बदल –
एकापेक्षा अधिक पीपीएफ खाते असतील तर प्रायमरी खात्यावर सध्याचा व्याजदर लागू होईल. तसेच सेकंडरी खात्याला प्रायमरी खात्यात मर्ज केले जाईल. दोनपेक्षा अधिक खाते असतील तर त्या खात्यांवर खाते चालू केलेल्या तारखेपासून शून्य व्याज मिळेल.
१ ऑक्टोबरपासून सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) बदल झाले आहेत. नव्या नियमानुसार आजोबा-आजीने संबंधित मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेत खाते चालू केले असेल तर असे खाते मुलीच्या आई-वडिलांकडे वर्ग करण्यात येईल. दोनपेक्षा अधिक खाते असतील तर अतिरिक्त असलेले खाते बंद करण्यात येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community