Jammu and Kashmir निवडणूक संपली, दुसऱ्याच दिवशी भाजपा उमेदवाराचा मृत्यू

भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता

92
Jammu and Kashmir निवडणूक संपली, दुसऱ्याच दिवशी भाजपा उमेदवाराचा मृत्यू
Jammu and Kashmir निवडणूक संपली, दुसऱ्याच दिवशी भाजपा उमेदवाराचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. दि. १ ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरमधील सात जिल्ह्यातील ४० जागांवर मतदान झाले. मात्र दि. २ ऑक्टोबरला भाजपला जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मोठा धक्का बसला आहे. कारण याच दिवशी जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) माजी मंत्री आणि भाजपचे सुरणकोटमधील उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी (Mushtaq Ahmad Shah Bukhari) यांचे निधन झाले आहे. त्यामुळे भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुखारी काही दिवसांपासून अस्वस्थ होते आणि दि. २ ऑक्टोबरला सकाळी सात वाजता त्यांना हदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे त्यांचे निधन झाले. निधनावेळी मुश्ताक अहमद शाह बुखारी (Mushtaq Ahmad Shah Bukhari) ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

( हेही वाचा : Western Railway चे नवे वेळापत्रक; ‘या’ तारखेपासून १२ नव्या फेऱ्या

सुरणकोटमध्ये दोन वेळा आमदार राहिलेल्या बुखारी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. केंद्राने बुखारी (Mushtaq Ahmad Shah Bukhari) यांच्या पहाडी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिल्याने ते भाजपमध्ये सामील झाले होते. अनुसूचित जमातीचा दर्जाबाबात फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्याशी झालेल्या वादानंतर बुखारी यांनी फेब्रुवारी २०२२मध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षासोबत असलेली ४ दशकांची साथ सोडली होती.

दरम्यान२०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत त्यांना सुरणकोटमधून भाजपतर्फे उमेदवारी ही देण्यात आली होती. मात्र निवडणूकीसाठी मतदान झाल्यानंतर त्यांचे निधन झाले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मतदानापूर्वी एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्या जागेवरील निवडणूक आयोग रद्द करतो. आणि नव्याने मतदानाची तारीख जाहिर करतो. मात्र मतदानानंतर मृत्यू झाल्यास निश्चित वेळापत्रकानुसार मतांची मोजणी होते. त्या मोजणीत जर मृत उमेदवार विजयी झाल्यास निवडणूक रद्द केली जाते. तसेच १९५१ च्या कलम १५१ अ अंतर्गत त्या जागेवर सहा महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुका घेतल्या जातात.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.