Tulsi Lake मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवणार, २५ एमएलडीचा उभारणार नवा प्रकल्प

215
Tulsi Lake मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवणार, २५ एमएलडीचा उभारणार नवा प्रकल्प
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावातील (Tulsi Lake) पाण्याचे जलशुद्धीकरण केंद्र आता जुने झाल्याने त्या जागी नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या १८ दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे असणारे हे जलशुद्धीकरण प्रकल्प आता २५ दशलक्ष लिटर क्षमतेचा केला जाणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्यासाठी तुळशी तलावाचे (Tulsi Lake) बांधकाम १८७२ रोजी करण्यात आले. या तलावाची एकूण साठवण क्षमता ही ८ हजार ०४६ दशलक्ष लिटर एवढी असून प्रति दिन या तलावातून १८ दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या तलावातील पाण्यावर शुद्धीकरण करून मुंबईकरांना याच ठिकाणांहून पाण्याचा पुरवठा केला जावा यासाठी हे नवीन तुळशी जलशुद्धीकरण केंद्रांचे बांधकाम करण्यात आले.

(हेही वाचा – Love Jihad रोखण्यासाठी आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या; हिंदु जनजागृती समितीचे आवाहन)

आरे कॉलनी मरोळ पोलिस लाईन आणि बांगोडा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र १९८५ पासून कार्यान्वित करण्यात आले. तेव्हापासून तब्बल ३९ वर्षांपासून या जलशुद्धीकरण केंद्रातून येथील रहिवाशांना पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु हे जलशुद्धीकरण केंद्र जुने झाल्यामुळे याचे आयुर्मान संपत आले. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्राचे नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय जलअभियंता विभागाने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या १८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राऐवजी आता २५ दशलक्ष लिटरचे केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी जलअभियंता विभागाच्यावतीने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. (Tulsi Lake)

जलशुद्धीकरण प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्याकरिता सुसाध्यता तपासणे, तपशीलवार अभ्यास, योजनेच्या तांत्रिक आणि पर्यावरणीय व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणे इत्यादी कामे सल्लागारांमार्फत सेवेमध्ये अंतर्भूत आहेत. यासाठी फ्रंट एंड इंजिनिअरिंग डिझाइनमध्ये सर्वात व्यवहार्य पर्याय विस्तृत करेल व त्यानुसार निविदा दस्तऐवज करून कंत्राटदाराच्या नेमणूकीसाठी निविदा प्रक्रियेस सहाय्य करतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सल्लागार सेवेसाठी टंडन अर्बन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून या सल्लागार सेवेसाठी सुमारे एक कोटी रुपये दखर्च केला जाणार आहे. (Tulsi Lake)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.