- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेकडून राबविल्या जात असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित सोनिया महिला बचत गटाच्या (Mahila Bachat Gat) (जी उत्तर विभाग) अध्यक्षा रेणुका सोनवणे, सदिच्छा महिला बचत गटाच्या (पी उत्तर विभाग) अध्यक्षा सीमा पाताडे यांची या कार्यक्रमात स्वच्छ्ता दूत म्हणून निवड करण्यात आली. सोनिया आणि सदिच्छा हे दोन्ही महिला बचत गट ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व वस्ती स्वच्छ्तेची कामे करतात.
(हेही वाचा – Balasaheb Thackeray Central Vaitrana Dam : पुढील अडीच वर्षांत सौर आणि जलविद्युत प्रकल्पातून प्रत्यक्षात विजेचा वापर)
गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जात आहे. याच अभियान अंतर्गत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘स्वच्छ भारत दिवस, स्वच्छ भारत अभियान’चा १० व्या वर्धापन दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देशातील ३२ राज्यातून महिला स्वच्छ्तादूतांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले तसेच महिलांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ‘स्वच्छ भारत दिवस, स्वच्छ भारत अभियान’ कार्यक्रमात या दोघींनी बुधवारी ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी सहभाग नोंदविला. या निवडीबद्दल महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दोन्हीही महिलांचे अभिनंदन केले. (Mahila Bachat Gat)
(हेही वाचा – SushilKumar Shinde यांच्या आत्मचरित्रात वीर सावरकरांची प्रशंसा; काँग्रेसचे टोचले कान)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित सोनिया महिला बचत गटाच्या (जी उत्तर विभाग) अध्यक्षा रेणुका सोनवणे, सदिच्छा महिला बचत गटाच्या (पी उत्तर विभाग) अध्यक्षा श्रीमती सीमा पाताडे यांची या कार्यक्रमात स्वच्छ्ता दूत म्हणून निवड करण्यात आली. सोनिया आणि सदिच्छा हे दोन्ही महिला बचत गट ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व वस्ती स्वच्छ्तेची कामे करतात. (Mahila Bachat Gat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community