RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला परवानगी द्या, मद्रास उच्च न्यायालय

परवानगी नाकारल्यास हा उच्च न्यायालयाचा अपमान

122
RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला परवानगी द्या, मद्रास उच्च न्यायालय
RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला परवानगी द्या, मद्रास उच्च न्यायालय

दसऱ्यात दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) वेगवेगळ्या भागात पथसंचलन होत असते. त्यात मद्रास उच्च न्यायालयाने दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला अनुमती देण्याचे निर्देश दिले आहेत. सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला तामिळनाडू सरकारने अनुमती नाकारली होती. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात संघाने मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) याचिका दाखल केली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) यासंदर्भात नुकताच निकाल दिला.

(हेही वाचा :  SushilKumar Shinde यांच्या आत्मचरित्रात वीर सावरकरांची प्रशंसा; काँग्रेसचे टोचले कान)

मद्रास उच्च न्यायालयाने निकाल देताना तामिळनाडू पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. उच्‍च न्‍यायालयाने (Madras High Court) म्‍हटले आहे की, सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमाला अनुमती दिली जाते. मात्र इतर कार्यक्रमांना अनुमती का दिली जात नाही? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. त्यामुळे पोलिसांनी नियमानुसार पथसंचलनाला परवानगी दिली नाही तर हा उच्च न्यायालयाचा अपमान आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमाच्‍या संदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्‍या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्‍य सरकारने या पथसंचलनाला अनुमती द्यावी, त्यात कोणतीही अतिरिक्त अट घालू नये, असे न्यायमूर्ती जी. जयाचंद्रन् यांनी सांगितले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.