भारत जगात महासत्ता बनेल; ब्रिटनचे माजी पंतप्रधान Tony Blair यांचे वक्तव्य

येत्या काळात जग वेगळ्या पद्धतीने बदलत जाणार आहे. पण तीन देश महासत्ता होण्याचा मार्गावर आहेत.

305
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर (Tony Blair)  यांनी 2050 पर्यंत अमेरिकेशिवाय भारत आणि चीन हे दोन देश देखील जगातील महासत्ता बनतील. चीन, भारत आणि अमेरिका हे तीन देश महासत्ता म्हणून उदयास आल्याने एक जटिल जागतिक व्यवस्था निर्माण होईल. त्यावर मात करण्यासाठी जागतिक नेत्यांना तयार राहावे लागेल, असे म्हटले.

महासत्ता होणारे तीन देश कोणते?

येत्या काळात जग वेगळ्या पद्धतीने बदलत जाणार आहे. पण तीन देश महासत्ता होण्याचा मार्गावर आहेत. ज्यामध्ये चीन, अमेरिका आणि भारत या तीन देशांचा समावेळ आहे, एक देश म्हणून तुमच्या बाजुने कोण कोण आहेत आणि तुमच्यासोबत किती देशांना जुळवून घ्यायचे आहे यावर तुमचं महत्त्व ठरते, असेही टोनी ब्लेअर (Tony Blair)  म्हणाले.
टोनी ब्लेअर हे 1997 ते 2007 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. सध्याची जागतिक परिस्थिती खूपच गुंतागुंतीची बनली आहे. मी पंतप्रधान होतो तेव्हा अमेरिका हा एकमेव मुख्य महासत्ता देश होता. पण आता चीन आणि भारत नवीन महासत्ता म्हणून उदयास येत आहेत. यासाठी इतर देशांना मुत्सद्दी रणनीतींचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला एक मजबूत युती तयार करावी लागेल, जी या तिन्ही महासत्तांशी समान पातळीवर बोलू शकेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.